Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“लोक नृत्य भारत भारती” महोत्सवाचे गडचिरोलीत ३ दिवसीय आयोजन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर, भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय व महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने “लोक नृत्य भारत भारती” महोत्सवाचे आयोजन विद्याभारती कन्या हायस्कूल, गडचिरोली येथे दिनांक १ ते ३ मार्च २०२५ दरम्यान दररोज संध्याकाळी ६.३० वाजता करण्यात आले आहे.

भारताची वैविध्यपूर्ण संस्कृती व लोककला पुनर्जीवित करण्यासाठी तसेच नव्या पिढीला याची ओळख करून देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय लोककलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्थानिक कलाकारांना मंच उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकार व महाराष्ट्र शासन संयुक्तपणे प्रयत्नशील आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या तीन दिवसीय महोत्सवामध्ये भारताच्या विविध राज्यांतील लोकनृत्यांच्या रंगारंग सादरीकरणांचा मनमोहक कार्यक्रम होणार आहे. यामध्ये – महाराष्ट्र: प्रसिद्ध लावणी / कोळी नृत्य, मध्य प्रदेश: बधाई / नोरता नृत्य, राजस्थान: रंगीला कालबेलिया / भवई / चरी नृत्य, हरियाणा: घूमर / फाग नृत्य, गुजरात: सिद्धी धमाल नृत्य, ओडिशा: सांबलपुरी / दालखाई नृत्य

आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेनुसार, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली व सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबईचे संचालक विभीषण चवरे आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या संचालिका श्रीमती आस्था कार्लेकर यांच्या नियोजनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. या महोत्सवासाठी दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था, गडचिरोली यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून सर्व रसिक प्रेक्षकानी या महोत्सवाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या संचालिका श्रीमती आस्था कार्लेकर गोडबोले व विभीषण चवरे , संचालक सांस्कृतीक कार्य मुंबई यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.