Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात उद्यापासून खाद्यान्न दुकाने सकाळी ८.०० ते दुपारी ३.०० वा. पर्यंतच राहणार सुरु

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • “मिशन ब्रेक द चैन” अंतर्गत केले काही बदल
  • विविध इमारतींचे आरोग्य सुविधांच्या निर्मितीसाठी अधिग्रहण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली दि. १९ एप्रिल: अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या खाद्यान्न बाबींना यात किराणामालाची दुकाने, भाजीपाल्याची दुकाने, फळविक्रेते, दूध पुरवठा केंद्रे (दुग्धशाळा), बेकरी, मिठाईची दुकाने, पशुखाद्य व इतर सर्व प्रकारची खाद्यान्न दुकाने इत्यादी आता सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये सकाळी ८.०० ते दुपारी ३.००  वाजेपर्यंत या कालावधीत सुरु ठेवण्याची अनुमती असेल. जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची वाढती संख्या लक्षात घेऊन यापूर्वी दिलेल्या आदेशामध्ये बदल केला आहे. आरोग्य सेवा, संबंधीत रूग्णालये, मेडिकल, इत्यादींना मात्र सदर वेळेचे बंधन लागु राहणार नाही. आता दुपारी ३.०० वा. नंतर  कारणांशिवाय सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला ये-जा करता येणार  नाही. अपवादात्मक परिस्थितीत औषधे घेण्याकरीता जायचे असल्यास सोबत वैध औषधोपचार चिठ्ठी सोबत असणे आवश्यक राहील.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

 अत्यावश्यक बाबी मध्ये पुढील अतिरीक्त बाबींचा नव्याने समावेश – वन विभागामार्फत मंजूर असलेले वनीकरणा संदर्भातील कामे, तसेच विमान कार्गो सेवा संबंधीत दुरूस्ती व देखभाल कामे, आणि शाळा/महाविद्यालयातील शिक्षक/प्राध्यापकांना शाळेत उपस्थित राहून ऑनलाईन क्लासेस घेता येतील.

गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करताना : केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली व उत्तराखंड या राज्यातुन येणाऱ्या प्रवाश्यांना/लोकांना मागील ४८ तासामधील RTPCR चाचणी करूनच गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणे बंधनकारक राहील.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जिल्ह्यातील विविध शासकीय व खाजगी इमारतींचे आरोग्य सुविधांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिग्रहण

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्ह्यातील विविध शासकीय व खाजगी आश्रमशाळा, वस्तीगृह, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विश्रामगृह ताब्यात घेतली आहेत. जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढल्यास त्या ठिकाणी आरोग्य सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत . यामध्ये जवळपास १०७ इमारतींचा समावेश आहे. या ठिकाणी आवश्यकतेनुसार कोविड केअर सेंटर अनुषंगिक सोयी सुविधा उभारण्यात येणार आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.