Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चार लाडक्या बहिणींना नव्या मंत्रिमंडळात स्थान

भाजप कडून तीन तर अजित पवार गटाकडून एक महिला मंत्रीमंडळात

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नागपूर : दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी नागपूर येथी विधानभवनात  राज्य मंत्रिमंडळात विस्तार झालेला असून त्यामध्ये  चार महिलांना संधी देण्यात आली आहे. त्यातील तीन भाजपच्या तर एक अजित पवार गटाच्या आहेत. शिंदेसेनेकडून एकाही महिलेला संधी देण्यात आलेली नाही.

विधानसभेत २१ महिला आमदार आहेत. त्यात भाजपच्या १४ आमदार आहेत. त्यात, मेघना बोर्डीकर, मनीषा चौधरी, अनुराधा चव्हाण, श्रीजया चव्हाण, देवयानी फरांदे, सुलभा गायकवाड, सीमा हिरे, श्वेता महाले, मंदा म्हात्रे, माधुरी मिसाळ, नमिता मुंदडा, स्नेहा दुबे, मोनिका राजळे आणि विद्या ठाकूर यांचा समावेश आहे. त्यातील केवळ मेघना बोर्डीकर मंत्री झाल्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Aditi-Tatkare

अजित पवार गटाकडून अदिती तटकरे, सरोज अहिरे, सुलभा खोडके आणि सना मलिक चौधी जिंकल्या, त्यातील एकीला मंत्रिमंडळात स्थान मिळाले. शिंदेसेनेकडून मंजुळा गावित आणि संजना जाधव या दोन जणी तर काँग्रेसकडून ज्योती गायकवाड या एकट्याच विधानसभेत पोहोचल्या आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे विधान परिषदेच्या सदस्य असून त्यांना पक्षाने संधी दिली. मेघना बोर्डीकर या मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते  रामप्रसाद बोर्डीकर यांच्या त्या कन्या असून त्या  जिंतूर मतदारसंघातून दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेल्या आहेत.  माधुरी मिसाळ या चौथ्यांदा विधानसभेवर निवडून गेल्या आहेत.  अजित पवार गटाच्या अदिती तटकरे या शिंदे सरकारमध्ये महिला व बालकल्याण मंत्री होत्या.  त्या श्रीवर्धन मधून पुन्हा विजयी झाल्या आहेत. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या त्या कन्या आहेत. एकूण ४२ मंत्र्यांपैकी चार म्हणजे साधारण १० टक्के महिला मंत्री आहेत.

हे ही वाचा,

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.