Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चार जहाल नक्षल्यांनी केले पोलिसांसमोर आत्मसमर्पण

  • ०३ पुरुष आणि ०१ महीलेचा समावेश.
  • ११ लाख रुपयांचे बक्षीस प्रशासनाने केले होते जाहिर.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २३ मार्च: शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवाद्यांचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळुन वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण  केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवुन आणल्यामुळे माओवादी मोट्या  संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत. नुकतेच एकुण २२ लाख रुपये बक्षीस असलेल्या एकुण ०४ जहाल नक्षल्यांनी पोलीस अधीक्षक गडचिरोली अंकित गोयल यांच्या समोर आत्मसमर्पण केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

एक महीला आणि तीन पुरुष नक्षल्यांचा समावेश.

१) दिनेश उर्फ दयाराम गंगर नैताम हा २८ वर्ष वयाचा जहाल माओवादी असुन माहे डिसेंबर २००६ मध्ये टिपागड दलमच्या सदस्य पदावर भरती होवून माहे फेब्रुवारी २००७ पासून टिपागड तसेच चातगाव दलममध्ये कार्यरत होता.  माहे मार्च २००७ च्या शेवटी प्लाटून क्रमांक ०३ मधुन बदली होवुन भामरागड दलममध्ये कार्यरत होता. सन २०१०  ला एसीएम पदावर भामरागड दलममध्ये पदोन्नती झाली. माहे सप्टेंबर २०२१ ला दलम कमांडर म्हणुन पदोन्नती दिली व माहे डिसेंबर २०१८ पर्यंत कमांडर पदावर कार्यरत होता. माहे फरवरी २०१९ ला प्लाटुन क्रमांक ०७ चे गटण  करून प्लाटुन क्रमांक ०७ चे कमांडर बनला, माहे आक्टोबर २०२० पर्यंत भामरागड एरिया कमांडर पदावर कार्यरत होता. त्याचेवर चकमकीचे ११ गुन्हे, खुनाचे ०६ गुन्हे, जाळपोळीचे ०३ गुन्हे दाखलः असुन शासनाने त्याचेवर एकुण ०८ लाख रूपयावे बक्षीस जाहीर केले होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

२) नकुल उर्फ सुखालुराम झुमा मडावी हा ३५ वर्ष वयाचा माओवादी असुन तो माहे सप्टेंबर २००२ मध्ये टिपागड़ दलम मध्ये सदस्य म्हणुन भरती होवुनं माहे नोव्हेंबर २००३ मध्ये टिपागड दलममधुन बदलून प्लाटुन क्र. ०३ मध्ये  कार्यरत होता. सन २००६ मध्ये प्लाटुन क. ०३ चा सेक्शन क.०१ चा उपकमांडर तर सन २००८ मध्ये प्लाटुन क. ०३ वा सेक्शन क, चा कमांडर म्हणुन कार्यरत होता. माहे एप्रिल २००७ मध्ये नक्षल सदस्या निला कुमरे हिच्यासोबत लग्न केले. त्याचेवर चकमकीचे ०९ गुन्हे, ०४ खुजाचे, जाळपोळीचे ०५ गुन्हे, ०१ भूसुरुंग स्फोटाचे गुन्हे दाखल असुन, त्यांच्यावर शासनाने ०८ लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

३) निला रुषी कुमरे ही ३४ वर्ष वयाचा माओवादी असुन ती माहे. नोव्हेंबर २००५ ला कसनसूर दलम मध्ये  सीएनएमएम टिममध्ये सदस्य पदावर भरती होवुन सन २००७ मध्ये नकुल उर्फ सुखालुराम डुमा मडावी. प्लाटुन  क्र.०३ सेक्शन क. ०१ चा कमांडर याचेसोबत लया कलन ते दोघेही कसनसूर दलममध्ये कार्यरत होते. तिचेवर चकमकीचे ०३ गुन्हे, ०३ सुनाने, जाळपोळी ०४ गुन्हे दाखल असुन, त्यांच्यावर शासनाने ०२ लाख रूपयाचे  बक्षीस जाहीर केले होते.

४) शरद उर्फ रमेश उर्फ गोविंदा सामजी आतला. हा २६ वर्ष तयाचा माओवादी असुग तो माहे जानेवारी २०११ ला. चालगाव दलम मध्ये सदस्य म्हणुन भरती होवुन माहे सप्टेंबर २०१९ ला पीपीसीएम पदावर पदोन्नती होवून माहे नोव्हेंबर २०२० पर्यंत झोन टिडीला पीपीसीएम पदावर आजपावेतो कार्यरत. त्याच्यावर चकमकीचे ०६ गुन्हे, ०२ खुनाचे गुन्हे दाखल असुन, त्याचेवर शासनाने ०४. लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. गडचिरोली पोलीस दलाने सातत्यपूर्ण यशस्वी नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच गेल्या दोन वर्षापासुन नागरी कृती शाखेमार्फत गडचिरोली पोलीसांनी जिल्हाभरात आदिवासी बांधवांकरीता घेतलेले जनजागरण मेळावें, शांती मेळावे, रोजगार मेळावे, यामभेटी तसेच जे तरुण तरुणी नक्षलमध्ये भरती झाले आहेत, त्यांच्या घरी पोलीसांनी जावुन त्यांना सुखी जीवनाचे महत्व पटवुन सांगितल्याने व नक्षल नातेवाईकांसाठी दिलेली मदत व आयोजित केलेल्या सहली यामुळे त्यांच्या मनात पोलीस दलावर निर्माण झालेला विश्वास प्राप्त झाल्याने आज या ०४ जहाल माओवाद्यांनी हे आत्मसमर्पण केले आहे.

देवासी भागातील जनतेकडून नक्षलवादयांना मिळणारा अल्प प्रतिसाद, नक्षलवादी आदिवासी लहान मुले- मुली यांचा छळ करत त्यांचा नक्षली कारवायांसाठी करून घेत असलेला वापर, वरीष्ठ नक्षलवादी आपल्या कुटूंबासह राहत असताना आम्ही मात्र वर्षानुवर्षे आपल्या आप्तस्वकीयांपासुन लांब राहत असल्याची खंत मनात नेहमी असते. आपल्या कुटुंबांसोबत राहण्यासाठी आपण या नरक जीवनाला कंटाळुन सुखी जीवनाची कास धरण्यासाठी आत्मसमर्पण करत असल्याचे आत्मसमर्पत माओवादयांनी स्पष्ट केले..

यावेळी त्यांनी दलममधील इतर माओवादी यांनी देखील हिंसाचाराचा मार्ग सोडून आपणच आपल्या आदिवासी बांधवांवर करत असलेले अनन्वित अत्याचार थांबवुन आपल्या भागाचा देखील इतर उन्नत समाजाप्रमाणे विकास व्हावा. या दृष्टीने विकासाच्या मुळ प्रवाहात येण्यासाठी आत्मसमर्पण योजनेचा फायदा घेत विकासाच्या मुळ प्रवाहात यावे याबद्दल आवाहन केले.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे सन २०१९-२१ सालामध्ये आजपर्यंत एकुण ३७ माओवादयांनी आत्मसमर्पण केले असुन, यात ०४ डिव्हीसी, ०२ दलम कमांडर, ०२ दलम उपकमांडर, २८ सदस्य,०१ जनमिलीशिया यांचा समावेश आहे. विकास कामांना. आडकाठी निर्माण करणाऱ्या नक्षलवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल. असे आवाहन गडचिरोली चे पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी केले आहे.

Comments are closed.