Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महिला मुक्ती मोर्चाच्या तक्रारी वरून आ. कडू विरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अमरावती, 28 ऑक्टोबर :-  आ. रवी राणा विरुद्ध टीका करताना आ. बच्चू कडू यांनी महिलांविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप करत महिला मुक्ती मोर्चा कडून बच्चू कडूवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.  राजापेठ पोलिसांनी आ. बच्चू कडू विरुद्ध महिलांची बदनामी केल्याप्रकरणी ५०१ नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

आ. रवी राणा यांनी १ नोव्हेंबरच्या आत पुरावे सादर करावेत. अन्यथा हिजडा घोषित करेन अशी भाषा वापरली होती. त्यामुळे महिला अमरावतीत आक्रमक झाल्या. महिलांविषयी अपशब्द वापरणे योग्य नसल्याचं मत महिलांनी व्यक्त केलं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.