Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दहशतवादाची लढाई सगळ्या देशांनी सामुहिकपणे लढली पाहिजे – मुख्यमंत्री शिंदे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई,  28 ऑक्टोबर :- आज दहशतवाद संपूर्ण जगासमोरचा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. दहशतवाद मुळासकट संपवणे हाच या परिषदेचा मुख्य उद्देश असून, दहशतवादाची ही लढाई सगळ्या देशांनी सामुहिकपणे लढली पाहिजे असे मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे. ताज हॉटेलमध्ये या दहशतवादविरोधी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेदरम्यान ते माध्यमांशी बोलत होते.

मुंबईमध्ये २६/११ ला जे घडले ते या देशात कोणीही विसरू शकत नाही.  आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह हे दहशतवादाविरोधी लढण्यास पूर्णपणे सक्षम आहेत आणि आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत.  दहशतवादाविरुद्धची लढाई ही कोणी एकाने नव्हे तर सर्वांनी एकत्रितपणे लढण्याची गरज असल्याचे मतही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ताज हॉटेलमध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी सुरक्षा परिषदेला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सर्व देशांचे राजदूत उपस्थित होते.  यादरम्यान २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्वप्रथम परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ताज हॉटेलमधील हुतात्मा स्मारकावर पुष्पहार अर्पण केला. यानंतर परराष्ट्रमंत्र्यांनी दहशतवादावर पाकिस्तानला चांगलेच घेरले. या महत्त्वाच्या बैठकीत दहशतवादाशी मुकाबला करण्याच्या सर्व सूचना आणि पद्धतींवर चर्चा करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

महिला मुक्ती मोर्चाच्या तक्रारी वरून आ. कडू विरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल

‘भारत जोडो यात्रे’च्या नांदेड जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

Comments are closed.