Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज 03 जण कोरोनामुक्त

02 नव्या बाधितांची नोंद

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली ६ जुलै :- 

आज गडचिरोली जिल्हयात 475 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या 02 असून कोरोनामुक्ताची संख्या 03 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37564 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36761 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 28 झाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 775 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.86 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.07 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के झाला आहे.

आज नविन बाधितामध्ये धानोरा तालुक्यातील 01 व कोरची तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यामध्ये अहेरी तालुक्यातील 03, जणाचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.