Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

निष्ठा ठेवून काम केलं तर यश नक्की मिळतं – कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

गोंडवाना विद्यापीठात विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली ६ जुलै :-  विद्यार्थी दशेत असताना आपण ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कसा विचार करतो. त्यासाठी कष्ट कसे उभे करतो हे महत्त्वाचे आहे तुम्ही सगळे पोलीस होण्याचा विचार करत आहे हे ठीक आहे पण त्याही पुढे जाऊन मला मोठ्या पदापर्यंत कसे पोहोचता येईल. याचा विचार व्हावयास हवा. संधी आयुष्यात खूप येत असतात पण अडचण अशी असते की आपण त्या दृष्टिकोनातून निष्ठा ठेवून काम केलं तर यश नक्की मिळते असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी केले . गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते .

पोलीस भरतीपूर्व शारीरिक प्रशिक्षण शिबिर 15 जून पासून 15 जुलै 2022 पर्यंत आयोजित केले आहे .या शिबिरातील लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल झेड. चिताडे, संचालक राष्ट्रीय सेवा योजना डॉ. शाम खंडारे उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे म्हणाले , कुलगुरू महोदय यांची नेहमीच तळमळ असते की विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे ट्रेनिंग मिळावे आणि विद्यार्थ्यांचा विकास कसा करता येईल यासाठी प्रयत्न करावे. गोंडवाना विद्यापीठातून ज्या विद्यार्थ्यांना पोलिस भरतीपूर्व शारीरिक प्रशिक्षण दिल्या जात आहे. त्याचा फायदा निश्चितच विद्यार्थ्यांना होऊन ते यशस्वी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केवळ प्रवेश देणे, परीक्षा घेणे, आणि निकाल लावणे हा विद्यापीठाचा मानस नसून याही पुढे जाऊन विद्यार्थ्यी आणि या परीक्षेत्रात राहणाऱ्या सर्वांसाठी पाठबळ निर्माण व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
पोलीस भरती पूर्व शारीरिक प्रशिक्षण शिबिरात एकूण 74 विद्यार्थी असून नूकत्याच झालेल्या लेखी परिक्षेत 42 विद्यार्थी पास झाले आहेत आणि त्यातील 32 विद्यार्थी मेरिटमध्ये आहेत.

या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षक आशिष नंदनवार यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन शारीरिक शिक्षण विभाग संचालक डॉ. अनिता लोखंडे आणि आभार संचालक राष्ट्रीय सेवा योजना डॉ.शाम खंडारे यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.