Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी येथील एका वृद्धेच्या मृत्यूसह जिल्हयात आज ९८ नवीन कोरोना बाधित.

सक्रिय बाधितांपैकी 76 जणांची कोरोनावर मात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि.२५ ऑक्टो.:

जिल्हयात आज अहेरी येथील ५५ वर्षीय निमोनियाग्रस्त कोरोना बाधित महिलेचा मृत्यू झाला. तसेच ९८ जण नव्याने कोरोना बाधित आढळून आले. जिल्ह्यातील 76 जणांनी यशस्वीरीत्या कोरोनावर मात केली. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित ५२७८ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ४३२८ वर पोहचली. तसेच सद्या ९०१ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण ४९ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.०० टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण १७.०७ तर मृत्यू दर ०.९३ टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवीन ९८ बाधितांमध्ये गडचिरोली ४१, अहेरी ५, आरमोरी ७, भामरागड ४, चामोर्शी २१, धानोरा १, एटापल्ली ७, कोरची ५, कुरखेडा ४, मुलचेरा १, सिरोंचा १ व वडसा येथील १ जणाचा समावेश आहे.आज कोरोनामुक्त झालेल्या ६३ रूग्णांमध्ये गडचिरोली २०, अहेरी २, आरमोरी ५, भामरागड ९, चामोर्शी ०, धानोरा १, एटापल्ली २, मुलचेरा ३, सिरोंचा १, कोरची १२, कुरखेडा १ व वडसा मधील ७ जणांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नवीन ९८ कोरोना बाधितांमध्ये गडचिरोलीमधील आरमोरी रोड ४, रामपुरी वार्ड १, आनंद नगर १, आशिर्वाद नगर १, चामोर्शी रोड २, फुलेवार्ड १, शहर इतर २, गांधी वार्ड १, गोकुळनगर २, इंदिरा गांधी चौक १, आटीआय चौक १, कन्नमवार वार्ड १, लक्ष्मीनगर १, मेडिकल कॉलनी १, मुरखळा १, नवेगाव ७, जामा मस्जिद जवळ १, नगर परिषदेजवळ १, रेड्डी गोडावून जवळ १, पोटेगाव पीएचसी, रामनगर २, सर्वोदया वार्ड १, शाहूनगर १, स्नेहानगर १ व टी पाँईंट ४ जणांचा समावेश आहे. अहेरीमधील दोन स्थानिक, आलापल्ली १, बोरमपल्ली १ व महागाव १. आरमोरी मधील १ डोंगरगाव व इतर स्थानिक आहेत. भामरागड मधील सर्व स्थानिक आहेत. चामोर्शीमधील १० आष्टी येथील व ६ चामोर्शी शहरातील, लखमापूर बोरी २, रेगडी १ व तळोधी २. धानोरा मधील १ जण स्थानिक आहे. एटापल्ली ७ मध्ये २ स्थानिक, गट्टा १, आरएच कॉलनी १, एसआरपीएफ २ व बोलेपल्ली पोलीस १ जणाचा समावेश आहे. कोरची मधील सर्व स्थानिक आहेत. कुरखेडा मधील १ खेडेगाव, चिखली १ व इतर सर्व स्थानिक आहेत. वडसा येथील १ जण गांधी वार्ड मधील आहे.

Comments are closed.