Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली वनविभागातर्फे जागतिक बांबू दिन उत्साहात साजरा !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली,19, सप्टेंबर :-  गडचिरोली वनविभागातर्फे दिनांक १८ सप्टेंबर रोजी जागतिक बांबू दिन टिप्पागड सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी आमदार नामदेवराव उसेंडी यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ समाजसेवक श्री. देवाजी तोफा हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्धघाटन उप वनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा यांनी दीप प्रज्वलन करून केले. आपल्या प्रस्ताविक भाषणात श्री. एस.एल.बिलोलीकर यांनी बांबूचे महत्व कळण्यासाठी आपण बांबू दिवस साजरा करीत आहोत असे सांगितले. बांबू हे हिरवे सोने आहे याच्या उत्पतीमुळे आपली सामाजिक व आर्थिक उन्नती होईल असे हे वनोपज आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यात असणारे बांबू क्षेत्र महाराष्ट्र बांबू विकास मिशन तर्फे राबविण्यात येणारे बांबू वृक्ष लागवड योजना, राष्ट्रीय बांबू मिशन व अटल बांबू समृद्धी योजना याबाबत विस्तृत माहिती त्यांनी दिली.

पारडी येथे बांबू शेती लागवड करणारे शेतकरी संजय धनदाटे,हरिदास कुंभारे,चंद्रशेखर मुरतेली, यांनी आपले अनुभव कथन करून बांबू शेती कशी फायदेशीर आहे याचे महत्व सांगितले. सेवानिवृत्त पोलीस उप अधीक्षक बी.डी.मडावी, यांनी शेतकरी उत्पादक कंपनी गठीत करून बांबू लागवडी संबंधित असलेल्या प्रयोगाची माहिती दिली. जेष्ठ समाजसेवक देवाजी तोफा यांनी शेतकरी व कर्मचारी यांच्यात समन्वय असणे आवश्यक असल्याचे सांगून बांबू क्षेत्राची कार्ययोजना तयार करून शिस्तबद्ध पद्धतीने बांबूचे संरक्षण व संवर्धन केल्यास त्यापासून चिरकाल उत्पन्न मिळेल असा आशावाद व्यक्त केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि गडचिरोली जिल्हा आदिवासी बांबू प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित चे अध्यक्ष व माजी आमदार नामदेवराव उसेंडी यांनी बांबूच्या झाडाबाबत विस्तृतपणे माहिती देत ते निर्माण करीत असलेले पर्यावरण पूरक बांबू प्रक्रिया केंद्रामुळे तरुणांना रोजगार व शेतकऱ्यांना उत्पन्न मिळणार असल्याची माहिती दिली.तसेच जिद्द, चिकाटी व तशी मानसिकता ठेवून बांबू लागवड प्रकल्प राबविल्यास पर्यावरण पूरक विकासाची संकल्पना साकार करता येईल ,असे प्रतिपादन केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती स्मिता तातावार वनरक्षक यांनी केले. तर उपस्थितांचे आभार सहाय्यक वनसंरक्षक गडचिरोली श्री. सोनल भडके यांनी मानले. सदर कार्यक्रमास बांबू उत्पादक शेतकरी , संयुक्त वनव्यवस्थापन समिती ,पेसा, ग्राम सभांचे व वनहक्क समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी, गडचिरोली श्री. अरविंद पेंदाम व अधिनस्त कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

 

हे देखील वाचा :-

मुल येथे होणाऱ्या सुरजागड लोह प्रकल्पाच्या मालधक्क्याला स्थानिकांचा प्रचंड विरोध.

एस.टी. महामंडळ आर्थिक संकटात !

Comments are closed.