Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी अतिसंवेदनशील असलेले लाहेरी येथे प्रजासत्ताक दिन केला साजरा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

लाहेरी गडचिरोली 26 जानेवारी :- प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगढ सीमेलगत असलेले गडचिरोली पोलिस दलाचे सर्वात दूरचे उपपोस्टे लाहेरी अतिसंवेदनशील असलेले ठिकाणी या ठिकाणी मा.पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी लाहेरी येथे भेट देऊन प्रजासत्ताक दिन साजरा केला. याप्रसंगी लाहेरी हद्दीतील आदिवासी बांधव तसेच आश्रम शाळा व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. पोलिस अधीक्षक यांनी या भागातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या व शालेय विद्यार्थ्यांना मिठाई व चाॅकलेट वाटप केले तसेच लाहेरी येथील जवानांचे मनोबल वाढविले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कार्यक्रमास अपर पो.अधीक्षक अनुज तारे(अभियान), अपर पो.अधीक्षक  कुमार चिंता (प्रशासन), अपर पो.अधीक्षक यतिश देशमुख , असिस्टंट कमांडंट तरुणकुमार तसेच लाहेरी चे सरपंच राजेश्वरी बोगामी, व इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभारी अधिकारी लाहेरी पोउपनी  महादेव भालेराव, पोउपनि/सचिन सरकटे, पोउपनी /संतोष काजले व सर्व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.