Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

घुग्घुसवासीयांचा ग्रामपंचायतच्या निवडणुकीवर बहिष्कार; कडकडीत बंद

विविध सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षांचा ठराव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर डेस्क, २४ डिसेंबर:- चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुसला नगर परिषदेचा दर्जा देण्याची मागणी करीत आज दि. २४ डिसेंबर रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला.तसेच गावकऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गावातून कोणतेही उमेदवार नामांकन दाखल करणार नाहीत. या संदर्भात सामाजिक संघटनेसह सर्व राजकीय पक्षाचा गावात ठराव घेवून घेतला निर्णय घेण्यात आला.
घुग्गुस शहराला ग्रामपंचायतऐवजी नगर परिषदेचा दर्जा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत ओहे. त्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सर्व सामाजिक राजकीय पक्षाकड़ून घुग्गुसमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. त्याला नागरिकांनी उत्फुर्स प्रतिसाद दिला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

घुग्घुस येथे ग्रामपंचायत असून त्याएवजी नगर परिषद स्थापन करण्याबाबत सर्व सामाजिक राजकीय पदाधिकारीयांची  बैठक ग्रामपंचायत घुग्घूसच्या पटांगणात घेण्यात आली आहे. घुग्घुुस येथे नगर परिषदेची प्राथमिक अधिसूचना काढली होती. परंतु सोबतच ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रमसुध्दा जाहीर करण्यात आला असल्याने नागरीकामध्ये संभ्रमाची स्थीती निर्माण झाली असल्याने घुग्घुस येथील भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, बीआरएसपी , बीएसपी, यंग चांदा ब्रिगेड आर पी.आय. तथा इतर सामाजिक संघटनांच्या पदाधिकारीयांची आणि जिल्हा परिषद सभापती नीतू विनोद चौधरी, पंचायत समिती उपसभापती निरीक्षण नारायण तांडा, पं.स.सदस्या सौ.रतिजा पवन आगदारी यांनी एकत्रित आले. त्यांनी घुग्घुस येथे नगर परिषद निर्माण करण्याबाबत एकमताने ठराव पारित केला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या अनुषघाने घुग्घूस येथिल सर्व पक्षिय पदाधिकारी, सामाजिक संघटना व गावकऱ्यांनी नियोजित घुग्घुस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येत असुन घुग्गुस येथे नगर परिषद स्थापन करावी म्हणून आज घुग्गुस कडकडित बंद पुकारण्यात आला आहे. जर नगर परिषदेची घोषणा केली नाही तर ग्रामपंचायत च्या निवडणुका येथे होणार नाही एक सदस्य फार्म भरणार नसून पूर्ण पणे या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Comments are closed.