Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पिक कर्ज द्या अन्यथा नक्षलवादी होण्याची परवानगी द्या! – स्वाभिमानी शेतकरी संघटनेची अजबच मागणी

राज्य सरकारच्या आदेशाला बँकांची केराची टोपली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

हिंगोली : तीन लाखापर्यंत शेतकऱ्यांना पीक कर्ज हे बिनव्याजी बँकांनी द्यावे तेही तात्काळ द्यावे आणि यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी वेळोवेळी बैठका घेऊन निर्णय घ्यावे जर बँका कर्ज देत नसतील तर तशा बँकांवर कारवाई करताना हयगय केली जाणार नाही असा दम सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपुर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

त्यानंतरही हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्ज दिले नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवत इशारा दिला आहे की, पीक कर्ज द्या अन्यथा आम्हाला नक्षलवादी होण्याची परवानगी द्या अशा स्वरूपाची आगळीवेगळी मागणी आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विशेष म्हणजे जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत अनेक बँकांनी अध्याप पीक कर्ज वाटप सुरू केला नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या मागणीचे निवेदन जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांना देऊन लवकरात लवकर पिक कर्ज द्यावे. अशी मागणी करण्यात आली आहे.

हे देखील वाचा  :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 मी राजकारणात आले म्हणून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय –  खा. नवनीत राणा

प्राचार्य संजीवकुमार भारद्वाज यांना ‘ग्लोबल प्रिंन्सीपल अवार्ड’ ने सन्मानीत  

‘त्या’ ४ मित्रांचा नदीत बुडून मृत्यू!, सहलीचा आनंद बेतला जीवावर

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.