निर्घुणपणे जातियवादातून हत्या करणा-या आरोपींला फाशीची शिक्षा द्या; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे
वंचित बहुजन आघाडीचे गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र निदर्शने आंदोलन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली,दि,६ : नांदेड जिल्ह्यातील बोंढारी हवेली येथिल आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता अक्षय भालेराव याची जातीयवादी गाव गुंडानी हत्या केली त्या घटणेचा तिव्र निषेध करीत हत्याकांडाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून सर्व दोषी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी वंचित बहुजन आघाडी जिल्हा गडचिरोलीच्या वतिने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य तिव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले.
यावेळी तिव्र निदर्शने करणा-या आंदोलकांनी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत नांदेड येथिल घटणेचा, भारतीय खेळाडूंचा लैंगिक अत्याचार करणा-या भाजपाचे खासदार ब्रिजभुषण सिंग व मुंबई दादर येथिल आंबेडकर भवन समोर वंचितचे युवा पदाधिकारी रामेश्वर रणशूर यांच्यावर हल्ला करणा-या हल्लेखोरांचा तिव्र शब्दात निषेध करीत घोषणाबाजीने जिल्हाधिकारी परिसर दणाणून सोडला.
यावेळी उपस्थित वंचितच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी मार्फत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही सादर केले.
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गावात साजरी केल्याचा राग जातीयवादी गावगुंडानी मनात धरून निर्घुणपणे हत्या करणे ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असून अशा विकृत मानसिकतेच्या गुंडाना फाशीची शिक्षा देण्यात येवून सदर खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे , नांदेड जिल्हा अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून महाराष्ट्र शासनाने घोषीत करावा , अक्षय भालेरावच्या कुटूंबातील व्यक्तींना शासकिय नोकरीत घेण्यात यावे तथा कुटूंबातील व्यक्तींना पन्नास लाख रुपये मदत निधी देण्यात यावा, भारतीय महिला खेळाडूंवर लैंगीक अत्याचाार करणा-या भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंग यांना तात्काळ अटक करण्यात यावी, मुंबई येथे वंचितचे पदाधिकारी परमेश्वर रणशूर यांच्यावर हल्ला करणा-या हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी आदि मागण्यां सुद्धा करण्यात आल्या आहेत.
सदर प्रकरणातील दोषी आरोपींना विलंब न करता कारवाई करावी अन्यथा वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष एड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात राज्यभर तिव्र आंदोलन करण्याचाही ईशारा देण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, महासचिव योगेंद्र बांगरे, तालुकाध्यक्ष बाशिद शेख, जिल्हा उपाध्यक्ष जी के बारसिंगे, महिला नेत्या मालाताई भजगवळी, शहराध्यक्ष दिलीप बांबोळे जिल्हा संगठक धर्मेंद्र गोवर्धन, शहर महासचिव सोनलदिप देवतळे, संघटक भारत रायपूरे, विलास केळझरकर, कृष्णा रोहनकर, सुरज खोब्रागडे, कवडू दुधे, विपीन सुर्यवंशी, शकुंतला दुधे, जावेद शेख, शोभा शेरकी, श्वेता बोरकुटे, वंदना येडमे, सोनम साळवे, शिल्पा दुर्गे, पुजा साखरे, तेजराव नेतनकर, गजानन मेश्राम, किशोर जाधव, वासुदेव मेश्राम, सुजाता वासनिक, कैलास खोब्रागडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे देखील वाचा ,
Comments are closed.