Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लहान मुलांनाही संधीवात – डॉ. सलील गानु

संधीवात म्हणजे काय? कसे ओळखाल?

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 17 जून – संधीवात हा वयस्क लोकांनाच नाही तर लहान मुलांनादेखील होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सांधैदुखी, हातापायची बोटे वाकडे होणे याकडे दुर्लक्ष न करता यावर वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे. कारण एकदा का संधीवातामुळे सांध्यांची झिज झाली की ते गोळ्या औषधांनी देखील पुर्ववत करता येत नाही. त्यामुळे संधीवाताकडे दुर्लक्ष न करता वेळीच त्यावर उपचाराची गरज आहे असे नागपूरचे संधीवात तज्ञ डॉ. सलील गानु यांनी सांगीतले. ते सर्च मध्ये  एक दिवसीय संधीवात उपचार शिबीरासाठी आले होते.

सर्चमध्ये झालेल्या एकदिवसीय संधीवात उपचार शिबीरात छत्तीसगड, कांकेर जिल्ह्याच्या पखांजूर गावातून एक लहान मुलगा संधावाताच्या उपचारासाठी आला होता. साधारणतः 7 ते 8 वर्षे वय असलेल्या या चिमुकल्याला संधीवातामुळे शरीरात सुजण आली होती. तसेच त्याची हातापायाची बोटे वाकडी होणे तसेच शरीराच्या कोणत्याही भागाला साधा स्पर्श झाला तरी त्याला असह्य वेदना होत असल्याचे त्याच्या वडीलांनी सांगितले. त्याच्यावर सर्च येथे नियमीत उपचार सुरू आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सर्च मध्ये ता. 17 जून रोजी संधीवात तपासणी व उपचार शिबीर झाले. मे 2023 नंतर हे दुसरे शिबीर सर्चमध्ये घेण्यात आले. वयस्क लोकांसोबतच आता लहान मुलांना देखील संधीवाताचा त्रास दिसून येतो. परंतू उपचाराअभावी लोक दुखण्यावर तात्पुरतं औषध घेऊन मुळ रोग दुर्लक्षित राहिल्याने अनेकांना याच्या कळा सोसत जीवन जगावे लागते. म्हणूनच सर्च येथे आता संधीवात शिबीर घेण्यात येत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

संधीवात म्हणजे काय? कसे ओळखाल?

आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा जॉइंट दुखत असेल सूज येत असेल तर आपण त्याला संधीवात असे म्हणू शकतो. शरीरातील एकापेक्षा जास्त सांध्यांना सूज येणं किंवा तीव्र वेदाना होणं याला ‘आर्थरायटीस’ किंवा संधिवात म्हणतात. हा प्रामुख्याने वृद्धांना होणारा आजार आहे. वाढत्या वयासोबत हळूहळू वाढत जाणारा हा आजार मानला जातो.

चातगाव स्थित सर्च येथे आता संधीवातावर उपचार उपलब्ध झाला आहे. यासाठी नागपुरचे सप्रसिद्ध संधीवातशास्त्र तज्ञ डॉ. सलील गानु हे उपचाराकरिता येतात. गडचिरोलीतील गरजू व ग्रामीण भागातील आदिवासींकरिता हा उपचार सवलतीच्या दरात सर्चमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.

हे पण वाचा :- 

Comments are closed.