Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता पदी डॉ. शैलेंद्र देव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली,  04 नोव्हेंबर :-  गोंडवाना विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या अधिष्ठाता (डीन) पदाचा प्रभारी पदभार डॉ. शैलेंद्र देव यांनी नुकताच स्विकारला. यापूर्वी विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता म्हणून डॉ.राजीव वेगिनवार यांच्या कडे पदभार होता. परंतु या पदाचा त्यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता (डीन) पदाचा प्रभारी पदभार डॉ. शैलेंद्र देव यांनी नुकताच स्विकारला.

डॉ.शैलेंद्र देव यांना अध्यापनाचा 25 वर्षांचा आणि संशोधनाचा 11 वर्षाचा अनुभव आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये 100 हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. 55 राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय परिषदेत उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी श्रीलंकेला भेट दिली आणि पेपर सादरीकरण सत्रासाठी ज्युरी सदस्य म्हणून काम केले. विविध संस्थांकडून अनेक पुरस्कार मिळाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गोंडवाना विद्यापीठाचे गणित विषयातील बोर्ड ऑफ स्टडीजचे सदस्य आहेत. गोंडवाना विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार २०२१ मध्ये त्यांना मिळाला आहे. पदव्युत्तर शैक्षणिक गणित विभागाचे विभाग प्रमुख म्हणून ते सेवा देत आहेत.संचालक (प्रभारी) विद्यार्थी विकास या पदाचा यशस्वीपणे कार्यभार ते सांभाळत आहेत. या निमित्ताने कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.