Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एसीबीची पत्रक वाटून भ्रष्टाचार विरूध्द नागरिकांमध्ये केली जनजागृती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 

पालघर, 04 नोव्हेंबर :-  दक्षता जनजागृती सप्ताहाच्या अनुषंगाने भ्रष्टाचार विरुद्ध नागरिकामध्ये जनजागृती करण्यासाठी अँन्टी करप्शन ब्युरो यांनी जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित केले. वाडा येथील निरनिराळ्या शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागावर एसीबी चे स्टिकर लावण्यात आले. तसेच बसस्थानक परिसरात लोकांना एसीबीची पत्रके वाटून जनजागृती केली. काॅर्नर मिटींग घेऊन भ्रष्टाचाराविरुध्द जनजागृती करण्यात आली.

विक्रमगड येथे सप्ताहाचे अनुषंगाने रिक्षाचालक, ग्रामस्थ यांची काॅर्नर मीटिंग घेण्यात आली. संबंधितांना एसीबीची कार्यपद्धती समजाऊन सांगून जनजागृती करण्यात आली. मनोर परिसरात सप्ताहाचे अनुषंगाने पोस्टर्स लावण्यात आले. कोणी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास एसीबी कार्यालयात तक्रार देण्याबाबत उपस्थितांना आवाहन करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पालघर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Comments are closed.