Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंडवाना विद्यापीठाच्या रासेयो संघास महाराष्ट्र शासनाचा ‘उत्कृष्ट प्रेरणा पुरस्कार’

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रेरणा: राज्यस्तरीय नेतृत्वगुण प्रशिक्षण शिबीरामध्ये गोंडवाना विद्यापीठाच्या संघाने ‘उत्कृष्ट प्रेरणा पुरस्कार २०२५’ हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला. यावेळी संघनायक प्रा. दयाराम मेश्राम उपस्थित होते.

दिनांक १७ ते २१ मार्च झालेल्या या शिबिरामध्ये राज्यातील विविध विद्यापीठांनी सहभाग नोंदविला होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या शिबिरामध्ये मुंबई, पुणे यासारख्या प्रगत विद्यापीठांना मागे टाकून गोंडवाना विद्यापीठाने प्रथम क्रमांकावर बाजी मारल्याने कुलगुरु डॉ. प्रशान्त बोकारे यांनी विजेत्या संघासह राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. श्याम खंडारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, सबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य, कार्यक्रम अधिकारी यांचे अभिनंदन केले.

विद्यापीठ संघास कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे, प्र – कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, रासेयो चे संचालक डॉ. श्याम खंडारे यांचे मार्गदर्शन लाभले.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.