Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिस मारहाणीत झाला

या प्रकरणी सबंधित पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करावा,विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई: परभणी प्रकरणी सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू नैसर्गिक नसून तो पोलिसांच्या मारहाणीत झाला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सरकारने या प्रकरणी कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी त्यांची आता पोलखोल झाली आहे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ विजय वडेट्टीवर यांनी केली.

परभणी संविधानाच्या अवमान प्रकरणी आंदोलन केलेल्या अनेक आंदोलनकर्त्यांचे कॉम्बिंग ऑपरेशन करून पकडण्यात आले. आणि पोलिस कोठडीत बेदम मारहाण करण्यात आली. त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू साठी जबाबदार असलेल्या पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी दोषी पोलिसांना निलंबित करण्यात यावे ,पोलिसांवर कठोर कारवाई करावी. याप्रकरणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न सरकारने केला आता मात्र सरकार उघडे पडले आहे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली.

Comments are closed.