Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोविंदा प्रथमेच परबच्या कुटुंबाला 9,लाख 99 हजारांची मदत

भाजपाने काढलेल्या विम्याचे पैसे कुटुंबाकडे सुपूर्द

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 30 नोव्हेंबर :-गोविंदा पथकात दुखापत होऊन दुर्दैवाने मृत्यू झालेल्या प्रथमेश परब याच्या कुटुंबाला आज भाजपाने काढलेल्या विम्याचे 9 लाख 99 हजार रूपये सुपुर्द करण्यात आले. भारतीय जनता पार्टी, मुंबईच्या वतीने दरवर्षी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांच्या सूचनेनुसार सुमारे 50 हजार गोविंदांचा दि. ओरियंट इन्शुरंन्स कंपनी मार्फत विमा उतरविण्यात येतो. यावर्षी दुर्दौवाने कु.प्रथमेश परब याचे उत्सवाच्या काळात अपघाती निधन झाले. भारतीय जनता पार्टी तर्फे ओरियंटल इन्शुरंन्स कंपनीने दिवंगत प्रथमेश याच्या नावे असलेल्या विम्याचे रुपये 9 लाख 99 हजार रुपये पाठपुरावा करुन मंजूर करुन घेतले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

खा. मनोज कोटक आणि भाजपा कोकण विकास आघाडी अध्यक्ष सुहास आडिवरेकर यांनी आज प्रथमेशच्या भांडूप येथील घरी त्याच्या वडिलांकडे सदर मदतीचा धनादेश सुपूर्द केला. प्रथमेशच्या जाण्याने कुटुंबाची झालेली हानी ही पैशाने भरुन निघणारी नाही. पण आम्ही या कुटुंबा सोबत आहोत एवढा धीर देण्याचा हा प्रयत्न असल्याचे मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.