Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बोडेना येथे मेकॅनाइज्ड ढेकी तांदूळ (ब्राऊन राईस) निर्मिती व विक्री केंद्राचे थाटात उद्घाटन .

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क,

बोडेना, 12 सप्टेंबर 2023 : बोडेना येथे, मेकॅनाइज्ड डबल आर्म ढेकीचे मान्यवरांचे हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले. परंपरागत पौष्टिक तपकिरी रंगाचे तांदूळ(ब्राऊन राईस) आपल्या दैनंदिनी आहारात समाविष्ट करण्यासाठी व विक्री साठी या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. पूर्वी लोक घरगुती बनविलेल्या ढेकी किंवा मुसळा ने कांडलेलेच तांदूळ वापरत होते, जे खूप पौष्टीक होते पण आता  पौलीश्ड तांदूळाचा इतका प्रचार प्रसार झाला आहे कि, लोक त्याच कडे वळले आहेत. हातसळीचे तांदूळ खानारे लोक म्हणजे मागासलेले आणि पांढरा शुभ्र पौलीश्ड तांदूळ खाणारे पुढारलेले, जणू अशी दरी बनली होती आणि हळू हळू मोठ मोठ्या राईस मिलचा बाजार उभा राहू लागला आणि परिणामी सगळेच लोक पौलीश्ड तांदूळ खायला लागलेत. पण पौलीश्ड तांदूळ तयार करताना तांदळामधील ८०% जीवनसत्व नष्ट होतात.

ढेकी च्या तांदळामध्ये पौलीश्ड तांदूळा पेक्षा कितीतरी पतीने बि१, बि२, लोह, फायबर, झिंक, फोलिक एसिड, आणि फोस्फोरस सापडतो. ढेकी मशीन हि केवळ तपकिरी तांदूळ निर्मिती करणारे यंत्र नसून या मध्ये ग्रामीण जीवन व्यवस्थेला व अर्थव्यवस्थेला उन्नत करणारी  क्षमता आहे अस प्रतिपादन बांकुरा उन्नायानी इंस्टीट्युट ऑफ इंगीनीरिंग चे चेरमन संसंका दत्ता हे प्रमुख अतिथीच्या व्यासपिठावरून बोलत होते. स्थानिक उदयोजगतेला चालना देण्यासाठी व कुपोषणाचे  प्रमाण कमी करण्यासाठी हि ढेकी अतिशय उपयोगी ठरेल असे डॉ सतीश गोगुलवार यांनी आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून गावातील प्रतिष्टीत नागरिक रामू होळी व सहउद्घाटक  म्हणून  सुमेंसिंग मडावी हे उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कार्यक्रमाचे अध्यक्ष  राजाराम नैताम हे होते. तसेच कार्यक्रमचे प्रमुख अतिथी तथा मार्दर्शक म्हणून इजामसाय काटेंगे,झाडूराम हलामी,  सियाराम हलामी, कुमारी जमाकातन, संसंका दत्ता, दिहरे सर तसेच इतर ग्रामसभेतून आलेलेल लोक व गावकरी मंडळी उपस्थित होती. गावातील आर्थिक उन्नती व पारंपारिक ठेवा मजबूत ठेवण्यासाठी हि ढेकी महत्वाची भूमिका बजावेल, असे मत इजामसाय काटेंगे यांनी व्यक्त केले. प्रमुख अतिथी च्या भाषणामधून झाडूराम हलामी व सियाराम हलामी यांनी पारंपारिक गोष्टीना उजाडा दिला. अध्यक्षीय भाषण करताना श्री राजाराम नैताम यांनी गोंडी भाषेतून लोकांना ढेकीचे वापर व आपल्या आहारात त्याचे समावेश करण्या संदर्भात आवाहन केल. आजपासून बोडेना, ता कोरची येथे ढेकी तांदूळ निर्मिती व विक्री केंद्र सुरु झाले आहे. मेकॅनाइज्ड ढेकी बसविण्यासाठी श्री. सुरेश काड्यामी, श्री. रायसिंग हलामी व रवी चुनारकर यांनी विशेष प्रयत्न केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.