Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सैराट फिल्म प्रसिद्ध अभिनेता (परश्या) आकाश ठोसर आज गडचिरोलीत!

जेटीएम स्टार इव्हेंट ग्रुप प्रस्तुत, ग्लॅम फेस ऑफ विदर्भ आणि अवॉर्ड शो कार्यक्रम, विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन करणार गौरव..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि, १३ सप्टेंबर : ग्लॅम फेस ऑफ विदर्भ आणि अवॉर्ड शोसाठी सैराट फिल्म प्रसिद्ध अभिनेता उर्फ (परश्या) आकाश ठोसर आज बुधवार १३ सप्टेंबर रोजी सुमानंद सभागृह येथील कार्यक्रमासाठी सायंकाळी ७:०० वाजता गडचिरोलीत आगमन होणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या कार्यक्रमाचे आयोजन जेटीएम स्टार इव्हेंट ग्रुप प्रस्तुत , ग्लॅम फेस ऑफ विदर्भ आणि अवॉर्ड शो कार्यक्रमाचे आयोजन जिल्हातील आदिवासी बहुल भागातील युवक युवतींना स्पर्धेत सहभाग घेता यावा. यासाठी दुसऱ्यांदा ज्योती उंदीरवाडे ,मोनिका निंबेकर यांच्या  मार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अवार्ड शो, मॉडलिंग स्पर्धा, फिटनेस मॉडलिंग स्पर्धा, दुल्हन मेकअप स्पर्धा ,मेहंदी डिझाइन स्पर्धा, अशा विविध स्पर्धांचे स्पर्धाचे आयोजन सकाळी १०:०० ते साय ७:०० पर्यंत राहणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या स्पर्धेत प्राविण्य प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र प्रसिद्ध अभिनेता सैराट फिल्म मधील परश्या उर्फ आकाश ठोसर तसेच लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्या हस्ते देवून गौरविण्यात येणार आहे.

तरी जिल्ह्याभरातील युवक ,युवतींना विविध स्पर्धेत आज नाव नोंदणी करून मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन ज्योती उंदीरवाडे आणि मोनिका निंबेकर यांनी केले आहे.

 

Comments are closed.