Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोळ्याच्या पार्श्वभूमीवर दारूविक्रेत्यांचा मुद्देमाल नष्ट

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

धानोरा, 13 सप्टेंबर : पोळ्याच्या पार्श्वभूमीवर धानोरा व गडचिरोली मुक्तिपथ टीमने सामूहिक अहिंसक कृती करीत तालुक्याच्या सीमावर्ती भागातील जंगलपरिसरात असलेला जवळपास 42 ड्रम मोहफुलाचा सडवा व साहित्य नष्ट केले.

पोळा या सणाच्या निमित्ताने दारुची मोठ्या प्रमाणात मागणी  असते, त्यामुळे विक्रेते हातभट्टी लावून जंगलपरिसरात दारू गाळतात. अशातच धानोरा ताुक्यातील जांभळी, सीताटोला आणि गडचिरोली तालुक्यातील रानभूमी या जंगलशिवारात दारूचे  भट्ट्या व मोह सडवा असल्याची माहिती गावसंघटनेकडून मिळाली. त्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी गडचिरोली व धानोरा तालुका टीमने सामूहिक अहिंसक कृती करीत शोधमोहीम राबवली. दरम्यान जंगलपरिसरात विविध ठिकाणी मिळून आलेला 42 ड्रम मोह सडवा व साहित्य नष्ट करण्यात आले. या कृतीमुळे अवैध दारूविक्रेत्यांचे मोठे नुकसान करण्यात मुक्तिपथ चमुला यश आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.