कातकरी समाजाचे स्थलांतर थांबवण्यासाठी विटभटटी योजने अंतर्गत अनुदान योजना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
पालघर, दि 24 नोव्हेंबर: जिल्हातील कातकरी ही आदिम जमात असुन कातकरी समाज हा अती मागासलेला असुन रोजगारासाठी व कुंटुबांच्या उदरनिर्वाहासाठी स्वताचे गाव सोडून शहराकडे कामकरण्यासाठी विटभटटीकाम करण्यासाठी स्थलांतर होत असतो, त्यामुळे त्याचे जिवनमान उंचावणे व शैक्षणिक प्रगती यामध्ये बाधा येते. सन २०१८-१९ या वर्षासाठी आदिम जमाती संरक्षण तथा विकास अंतर्गत जमातीचे स्थलातर रोखण्यासाठी आदिवासी विकास विभागाने आदिम जमातीच्या बचत गटांना विटभटटी व्यवसायाकरिता १० लाख रुपयांचे आर्थिक् सहाय्य करण्याबाबत योजना मंजुर करण्यात आली आहे.
प्रकल्प कार्यालय डहाणू अंतर्गत डहाणू, तलासरी, पालघर व वसईचा अंर्तभाव असुन कातकरी कुंटूबांचे उत्पन्न वाढी करता त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे व शैक्षणिक प्रगती करिता सामुहिक स्वरुपात बचत गटांना रोजगार मिळण्याकरिता १० लाख रुपये विटभटटी योजना राबविण्यासाठी मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. प्रकल्प कार्यालय डहाणू अंतर्गत ७ बचत गटांची निवड करण्यात येऊन योजना राबविण्याबाबत मार्गदर्शन व योजना सुरु करण्यासाठी योजनेचा पहिला हप्ता प्रती बचत गट रु. १,५०,०००/- बंचत गटांना प्रकल्प अधिकारी यांच्या हस्ते दिनांक १९/११/२०२० रोजी सुपूर्त करण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या वेळी प्रकल्प अधिकारी यांनी कातकरी समाजाचा विटभटटी या व्यवसायातील विधि अनुभव व कामात निपुण असल्यामुळे त्यांचे कडुन हि योजना चांगल्या प्रकारे राबविली जाईल अशी आशा व्यक्त केली. तसेच सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी योजना राबविताना घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन केले. सदर योजनेमुळे कातकरी समाजाचे स्थलांतर रोखण्यास मदत होईल त्यांच्या राहणीमानाचा दर्जा वाढण्यास मदत होईल जेणेकरुन त्यांची मुले शिक्षणाच्या मुळ प्रवाहात येतील.
Comments are closed.