Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नक्षलवाद्यांच्या शस्त्रसाठा निर्मिती करणारा कारखाना उध्वस्त करण्यात गडचिरोली पोलीस दलास मोठे यश

Get real time updates directly on you device, subscribe now.

नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून समजल्या जाणाऱ्या अबुझमाड सारख्या नक्षली दृष्ट्या अतिसंवेदनशील भागात जाऊन C-60 बहादूर जवानांनी नक्षलचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्यामुळे माड भागातील नक्षलवादाला जबर हादरा बसला आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ६ मार्च: छत्तीसगड सीमावरती भागात असलेल्या अबुझमाड घनदाट जंगलात सी-६० पथकाच्या जवानाने ४८ तास अथक परिश्रम करून नक्षलवाद्यांच्या शस्त्रसाठा निर्मिती करणारा कारखाना उध्वस्त करून मोहीम यशस्वीरीत्या पार पाडून पोलीस मुख्यालयात तब्बल दोन दिवसानंतर दाखल होताच पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी बहादूर सी-६० जवानांच्या पथकाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरून ४८ तास चाललेल्या कोंबिंग ऑपेरेशनमध्ये नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील,पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांचे मार्गदर्शन सदैव जवानासोबत असल्याने जवानाचे मनोबल उंचावले असल्याने जवानामध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण दिसून आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.