Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मेट्रो रेल्वेसह सायकल ट्रॅक, मिठी नदी किनारा सुशोभीकरणाच्या कामांचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. १९ मार्च: कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मुंबई मेट्रो लाईन ३ च्या संदर्भाने आज राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. याशिवाय यावेळी पश्चिम द्रुतगती महामार्गावरील प्रस्तावित सायकल ट्रॅक आणि मिठी नदी किनारा सुशोभीकरण याबाबतही यावेळी सादरीकरण करण्यात आले आणि आढावा घेण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू, वाहतूक शाखेचे सह पोलीस आयुक्त, माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांच्यासह महापालिकेचे सहायक आयुक्त आदी मान्यवर उपस्थित होते.

मेट्रोच्या विशेषत: पावसाळ्यापुर्वीच्या कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला. तसेच टनेलिंगची कामे, पुरनियंत्रण, पंपींग स्टेशन आदी बाबींचा यावेळी पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी आढावा घेतला. यानंतर झालेल्या बैठकीत पश्चिम द्रुतगती महामार्गावर करावयाच्या सायकल ट्रॅकचा आढावा घेण्यात आला. हा महत्वाकांक्षी प्रकल्प शहरात सायकल वापरास चालना देण्यास पर्यावरणपुरक आणि सहाय्यभूत ठरेल, असे पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले. मिठी नदीची स्वच्छता आणि नदीच्या किनाऱ्याचे सुशोभीकरण याबाबतही यावेळी माहिती घेण्यात आली. मुंबई शहरातून वाहणारी ही नदी प्रदुषणमुक्त करण्याबरोबरच तिचे सुशोभीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.