Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अपघाताचा बनाव करून खून करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी काही क्षणातच केले जेरबंद

लोणावळ्यातील भाजे गावच्या हद्दीतील यशवंतराव चव्हाण पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर घडली ही घटना.  

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

लोणावळा, दि. २० मार्च: यशवंतराव चव्हाण पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात झाल्याची माहिती मिळताच सदर ठिकाणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन घटनास्थळी दाखल होऊन अपघाताची पाहणी केली. घटनास्थळी जखमी निपचित पडलेला दिसताच पोलीसांना संशय आला की हा अपघाताचा बनाव असू शकतो.

       लोणावळा पोलिसांनी चौकशी केली असता एका मारुती ८०० वाल्याने पाठीमागून मोटार सायकलला धडक देऊन तो लोणावळ्याच्या दिशेला गेल्याची माहिती समजल्याने, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी मध्ये आरोपी रामदास भिमराव ओझरकर याची गाडी समोरून धडकल्याची पोलीस तपासात स्पष्ट होताच पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता त्याने आपणच खून केल्याचे कबूल केले.   

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

       मृतक सतीश ओजरकर ला जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी रामदास भिमराव ओझरकर यांनी आपल्या मारुती ८०० कार ने पाठीमागून धडक दिली. धडक देताच मृतक खाली पडल्यावर आरोपीने गाडीतून खाली उतरून गाडीतील लोखंडी रॉडने मृतक सतीश ओझरकर याच्या डोक्यावर मारून ठार केले.

       सदर आरोपीस गुन्हा घडल्यापासून काही मिनिटांतच लोणावळा ग्रामीण पोलीस दलाने आरोपीला अटक केलेली आहे. पर्यटन नगरीत हजारो पर्यटक येत असतात या गर्दीतून अचूक माहिती घेऊन पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर आणि त्यांच्या टीमने आरोपीच्या डोळ्यांत अंजन घालून त्याच्या मुसक्या आवळल्या.

Comments are closed.