Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. 8 डिसेंबर : महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दिनांक 9 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 2 वाजता चिचगाव ता. ब्रम्हपुरी येथे नागपूरहून आगमन व श्री. ठेंगरी यांच्याकडे सांत्वनापर भेट व नागरिकांसोबत थेट संवाद. दुपारी 3 वा. डोरली ता. ब्रम्हपुरी येथे आगमन व श्री. ठाकरे यांच्याकडे सांत्वनापर भेट व नागरिकांसोबत थेट संवाद. दुपारी 3.30 वा. डोरली येथून ब्रम्हपुरीकडे प्रयाण. सायंकाळी 4 वा. शासकीय विश्रामगृह ब्रम्हपुरी येथे आगमन व वन विभागाची आढावा बैठक. सायं. 5 वा. ब्रम्हपुरी येथून राजगड ता. मूल कडे प्रयाण. सायं. 6.30 वा. राजगड येथे आगमन व श्री. मारकवार यांच्याकडे सांत्वनपर भेट, सायं. 7 वा. राजगड ता. मुल वरून चंद्रपूरकडे प्रयाण. रात्री 8.30 वाजता हिराई विश्रामगृह ऊर्जानगर, चंद्रपूर येथे आगमन व मुक्काम.
दिनांक 10 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10 वाजता नियोजन भवन येथे जिल्हा क्रिडा समितीच्या बैठकीस उपस्थिती. सकाळी 11.30 वाजता ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील सा.बा.विभागांतर्गत सुरू असलेल्या कामाबाबत नियोजन भवन येथे आढावा बैठक. दुपारी 1.30 वाजता ब्रम्हपुरी, सावली व सिंदेवाही तलुक्यातील शासकीय कार्यालये व निवासस्थानाचे बांधकामसाठी लागणाऱ्या जमिनीसंबंधात आढावा बैठक. दुपारी 2.30 ते 3 राखीव. दुपारी 3 वा. नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक. सायं. 5 वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील पुरातन भागाचा विकास, महाकाली मंदिर परिसरातील विकास कामे, ज्युबली हायस्कूल परिसरातील कामे याबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक. सायंकाळी 6 वाजता चंद्रपूरहुन ब्रम्हपूरीकडे प्रयाण. सायं. 7.30 वा. शासकीय विश्रामगृह ब्रम्हपूरी येथे आगमन व राखीव. सायं. 7.45 वा. स्थानिक विवाह सोहळ्यास उपस्थित. रात्री 9 वा. ब्रम्हपुरी येथील निवासस्थानी मुक्काम.
दिनांक 11 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8.30 वा. ब्रम्हपूरीवरून चंद्रपूरकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता नियोजन भवन, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. सकाळी 10.15 वा. धान कापूस खरेदी करण्यासंदर्भात आदिवासी विकास महामंडळ व मार्केटींग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांसह सर्व संबंधीतांची नियोजन भवन येथे आढावा बैठक. सकाळी 11.30 वा. चांदा ते बांदा योजनेच्या कामासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक. दुपारी 12.30 वा. महसुली उत्पन्न वाढविण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक. दुपारी 1.30 वा. जिल्हा परिषद, चंद्रपूर अंतर्गत बांधकाम, सिंचन, पाणी पुरवठा, महिला व बालकल्याण, आरोग्य विभागाची सर्व संबंधीतांची आढावा बैठक. दुपारी 2.30 ते 3 राखीव. दुपारी 3 वा. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, जिल्ह्यात वन प्राण्यामुळे होत असलेली जिवितहानी, शेतीचे नुकसान भरपाई या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची नियोजन भवन येथे आढावा बैठक. सायंकाळी 4 वाजता विधानपरिषद आमदार ॲड. अभिजित वंजारी यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमास मातोश्री मंगल कार्यालय, चंद्रपूर, येथे उपस्थिती. रात्री 8 वाजता चंद्रपूर वरून नागपूरकडे प्रयाण.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.