Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आरोग्य तपासणी तथा रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

रक्तदान हेच श्रेष्ठदान - कपिल हटकर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुलचेरा 15 ऑक्टोबर :- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित, वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात विद्यार्थी, रा. से. यो. स्वयंसेवक, तालुक्यातील नागरिक, तसेच महाविद्यालयीन कर्मचारी वृंद असे मिळून एकूण ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच ८७ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा फायदा घेतला.

या कार्यक्रमाची सुरुवात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे औचित्य साधून उद्घाटक माननीय श्री. कपिल हटकर , यांनी मार्गदर्शनातून रक्तदानाचे महत्व विशद केले. रक्तदान हेच श्रेष्ठदान असे त्यांनी सांगितले. या रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री. कपिल हटकर , तहसीलदार, तहसील कार्यालय मुलचेरा हे होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रणजित मंडल तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून श्री अशोक भापकर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन मुलचेरा, श्री. विकास पाटील तालुका कृषी अधिकारी मुलचेरा, व डॉ ललित मल्लिक वैद्यकीय अधिकारी मुलचेरा उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी साठी ग्रामीण रुग्णालय मुलचेरा येथील वैद्यकीय चमू तसेच रक्तदान करण्यासाठी अहेरी येथील वैद्यकीय चमू उपस्थित होती. आरोग्य तपासणी दरम्यान विद्यार्थ्याची ब्लड प्रेशर (BP) , शुगर, तसेच रक्तगट तपासण्यात आले.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.