Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बनावट शपथपत्रांच्या आरोपांचा फुसका बार

उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा दिलासा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 15 ऑक्टोबर :-  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाला विविध मार्गांनी नामोहरम करण्याची एकही संधी शिंदे गट सोडत नाही आहे. अगदी निशाणी पासून ते अंधेरी पूर्व मधील विधानसभा उमेदवार ऋतुजा लटके यांच्या नोकरीच्या राजीनाम्यापर्यन्त अडचण आणण्याची एकही संधी शिंदे गट सोडत नाहीये. क्राईम ब्रँच च्या या वृत्तामुळे उद्धव ठाकरे गटाला दिलासा मिळाला आहे.

ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेली हजारो शपथपत्रे बनावट असल्याचा दावा शिंदे गटाने केला होता. त्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून चार पथके राज्यातील विविध जिल्ह्यात तपास करत होते. अखेर मुंबई गुन्हे शाखेकडून या प्रकरणी चौकशी पूर्ण झाली असून ठाकरे गटाने दिलेली शपथपत्र बोगस नसल्याचं चौकशीतून स्पष्ट झालं आहे. मुंबई गुन्हे शाखेनं हे वृत्त दिलं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मोठी उलथापालथ झाली आहे. शिंदे गटाकडून शिवसेना पक्षासह चिन्हावरही दावा करण्यात आला होता. आमचीच खरी शिवसेना असून आम्हाला पक्ष व चिन्ह आम्हाला मिळावं, असं शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे म्हटलं होतं. निवडणूक आयोगाकडे सुरू असलेल्या संघर्षात दोन्ही गटांकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. मात्र, शिंदे गटाने ठाकरे यांनी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र बोगस असल्याचा दावा केला होता.

ठाकरे गटाची जवळपास साडेचार हजार प्रतिज्ञापत्र ही बोगस असल्याचा आरोप शिंदे गटाने केला होता. त्यानंतर पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवून आपला तपास सुरू केला होता. कोल्हापूरसह नाशिक, पालघर, अहमदनगर यासारख्या राज्यात पोलिसांची पथक दाखल झाले होते व तपास करण्यात येत होता

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बोगस शपथ प्रतिज्ञाप्रकरणी अखेर गुन्हे शाखेचा तपास पूर्ण झाला असून ही शपथपत्र बोगस नसल्याचा खुलासा क्राइम ब्रँचने केला आहे. गेले तीन दिवस आम्ही ज्या कार्यकर्त्यांनी प्रतिज्ञापत्र दिले आहेत. त्या प्रतयेकाला समक्ष बोलवून त्यांची विचारपूस केली होती. त्यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे की नाही याची खात्री केली. त्यावेळी सर्वांनीच ते शपथपत्र दिलं आहे असं आमच्या जबाबात सांगितलं आहे, असं गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्यानं म्हटलं आहे. ती प्रतिज्ञापत्र बोगस किंवा खोटं असल्याचं आत्तापर्यंतच्या चौकशीत कुठेही निदर्शनास आलं नाहीये, असंही त्यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा :-

Comments are closed.