Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एसटीचा प्रवासही महागणार!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 15 ऑक्टोबर  :- सर्वसामान्य जनतेला दिवाळीमध्ये खिश्याला चांगलीच कात्री लागणार आहे. ऐन दिवाळीमध्ये एसटी महामंडळाने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या काळात तिकीटांचे दर 10 टक्कांनी महागणार असून 31 ऑक्टोबरपर्यंत ही भाडेवाढ असणार आहे.

दिवाळीच्या तोंडावर चाकरमान्यांना गावाकडे जाण्याचे वेध लागले आहे. सुट्टी टाकून चाकरमानी गावाकडे जाण्याची तयारी करत आहे. मात्र, लालपरी अर्थात एसटी बसच्या तिकीटांमध्ये आता वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाचे महसूल तोट्यात असल्यामुळे ही भाडेवाढ करण्यात येणार आहे. 21 तारखेच्या मध्यरात्रीपासून नवी भाडेवाढ लागू होणार आहे. ही भाडेवाढ 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत राहील.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.