Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वेब सीरिजच्या माध्यमातून तरुण पिढीची मानसिकता बिघडवत आहात:- सुप्रीम कोर्ट

एकता कपूरची कानउघाडणी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 15 ऑक्टोबर :- मागील काही दिवसांपूर्वी सुप्रसिद्ध चित्रपट आणि हिंदी टेलिव्हिजनची निर्माती एकता कपूर आणि तिची आई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खरंतर हा गुन्हा एका वेब सीरिजच्या माध्यमातून सैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा अपमान केल्याबद्दल एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर विरोधात गुन्हा दाखल केल्यामुळे करण्यात आला होता. यांच प्रकरणाबाबत सुप्रीम कोर्टने शुक्रवारी एकता कपूरच्या वेब सीरिजमध्ये आक्षेपार्ह दृश्यांबाबत न्यायालयाने तिच्यावर ताशेरे ओढले आहेत.

एकता कपूरवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तिने देखील कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. ज्याची आता सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान, कोर्टाने एकता कपूरवर ताशेरे ओढत म्हटलं की, तुम्ही देशाच्या युवा पिढीची मानसिकता दूषित करत आहात.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

न्या. अजय रस्तोगी आणि न्या. सी टी रविकुमार यांनी सुनावणी दरम्यान सांगितले की, “काहीतरी करायला हवे, तुम्ही या देशाची युवा पिढी दूषित करत आहात. ओटीटी सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. तुम्ही लोकांपुढे चांगले पर्याय ठेवायला हवे, मात्र तुम्ही याउलट तुम्ही तरुण पिढीची मानसिकता बिघडवत आहात.”

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.