Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रभासच्या ‘सालार’चा जगभरात डंका! कमाईचा आकडा शंभरी पार

फक्त प्रभासचीच हवा, 'सालार' हा सिनेमा 22 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

24 डिसेंबर  Salaar Box Office Collection :-  दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा ‘सालार’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘सालार’ या सिनेमाआधी प्रभासचे सिनेमे फ्लॉप ठरले होते. त्यामुळे त्याच्या या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसापासून सालारची चर्चा होती. आता सालार प्रेक्षकांच्या भेटीला आल्याने चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे.

सालारने पहिल्या दिवशी जबरदस्त ओपनिंगसह सर्व चित्रपटांना मागे टाकले आहे. ‘सालार’ने पहिल्याच दिवशी 90.7 कोटीच्या वर कमाई करत रेकॉर्ड केला होता.दरम्यान, शनिवारी प्रभास आणि पृथ्वीराजच्या सालार पार्ट-1 सीझफायरने किती कमाई केली ते जाणून घेऊया.

‘सालार’ने अवघ्या दोन दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. Sacknilk च्या रिपोर्टनुसार, 90.7 कोटींची ओपनिंग केल्यानंतर प्रभासच्या चित्रपटाने दुस-या दिवशी 55 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण 145.70 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

हे पण वाचा :-
https://loksparsh.com/education/distributed-a-set-of-books-required-for-abhyasika-competitive-exams-on-behalf-of-asanya-foundation/40704/
https://youtu.be/U4jPtTLDp14

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

 

Comments are closed.