Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आसान्या फाउंडेशनच्या वतीने अभ्यासिका,स्पर्धा परिक्षासाठी लागणारे पुस्तकांचा संच वितरीत

शिवणी गावात अभ्यासिका येथे स्पर्धा परिक्षा व शासकीय पद भरती करीता लागणारे उपयुक्त पुस्तकांचा संच उपक्रमात सहभाग घेतलेल्या युवक - युवतींना भेट..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि, २३ :  शहरालगत असलेल्या शिवणी गावात आसान्या फाऊंडेशन, गडचिरोली द्वारा “एक हात मदतीचा” -या  उपक्रमाअंतर्गत नव्याने सुरू करण्यात आलेल्या  माझी अभ्यासिका येथे स्पर्धा परिक्षा व शासकीय पद भरती करीता लागणारे उपयुक्त पुस्तकांचा संच आज दि,23.12.2023 रोजी उपक्रमात सहभाग घेतलेल्या युवक – युवतींना भेट देवून अभ्यासक्रमाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी धीरज ढेभरे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सर्वप्रथम स्वतः चा अभ्यास सकाळी ऊठुन कशी सुरुवात करावी ज्यामुळे अभ्यासात लक्ष केंद्रित होईल . रात्रिच्या शांततेत नीट अभ्यास होतो, याच आर्मपरिक्षण एकदा नीट करने गरजेचे आहे . त्यानुसार वेळापत्रक बनवा. जेव्हा आपला अभ्यास नीट होतो, तीच वेळ आपल्यासाठी योग्य आहे . मोटीव्हेशनसाठी सफलझालेल्या  लोकांच्या ईंटरव्हिव बघा, किती चिकाटीने सातत्याने काम केल्यामुळे ते यशाच्या ऊत्तुंग शिखरावर पोहोचलेत हे आपोआप समजेल.तेव्हाच मुलांना मोठी ध्येय बाळगून अभ्यास करण्यावर मा्गदर्शन केले, तर  नितेश सोमलकर , यांनी मुलांना स्पर्धा परीक्षेच्या तयारी विषयी मार्गदर्शन केले,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तर सोनल भडके विभागीय वनाधिकारी, यांनी मुलांना संबोधित करताना आजच्या काळात स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणे आव्हानात्मक होत आहे. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अनेक वर्षे कठोर परिश्रम घ्यावे लागते त्यातहि केवळ काहीजन  यशस्वी होतात. परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अभ्यास पद्धतीचे धोरण आखणे आवश्यक आहे. पुस्तकातून आपल्याला जगाची माहिती होते, चांगला नागरिक बनण्यास मदत होते, चांगला उद्योजक बनण्यास मदत होते, अधिकारी होता येते म्हणून पुस्तकाशी मैत्री करून आपला ध्येय निश्चित केलं तर आपल्याला यश नक्कीच मिळवता येईल असे स्पष्ठ मत भडके यांनी मार्गदर्शनात सांगितले .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मराव दुर्गमवार यांनी केले तर आभार प्रदर्शन हिराजी राऊत रोजगार सेवक ग्रा.प. शिवणी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता माननीय किशोर जी मानकर यांच्या मार्गदर्शनात अजय कुकुडकर, कालिदास राऊत पो. पाटील शिवणी, रुपेश मेश्राम, किशोर सोनटक्के, सिद्धार्थ गोवर्धन,सिद्धार्थ मेश्राम, छोटूभाऊ बोरावार, बाळू माडूलवारसह, सर्व सभासदांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला. यावेळी अभ्यासाविषयी विद्यार्थ्यांचा चेहऱ्यावर उत्सफूर्त आनंद झळकत होता हे विशेष.

 

Comments are closed.