Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

26 आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची एकत्रितपणे दिली क्षमता चाचणी;8069 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अहेरी प्रकल्पाचा स्तुत्य उपक्रम ...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि,22 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी अंतर्गत येणाऱ्या 11 शासकीय व 15 अनुदानित आश्रम शाळेतील 8069 विद्यार्थ्यांची क्षमता चाचणी दिनांक 22 डिसेंबर 2023 ला घेण्यात आलेली आहे.

सर्वच आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यासाठी विद्यार्थ्यांची अध्ययन पातळी समजून घेण्यासाठी व त्यावरील उपचारात्मक अध्ययन यासाठी आदिवासी विकास विभाग सर्व शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासणे व त्यानुसार अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया पूर्ण करणे या करिता महाराष्ट्रभर आदिवासी विकास विभाग अंतर्गत विद्यार्थ्यांच्या क्षमता चाचणीचे आयोजन करण्यात आलेले होते.

त्या अनुषंगाने अहेरी प्रकल्पातील एकूण 26 आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची एकत्रितपणे क्षमता चाचणी घेण्यात आली. त्याकरिता प्रकल्प कार्यालयातील कर्मचाऱ्यांची पर्यवेक्षक म्हणून प्रत्येक शाळेमध्ये नियुक्ती करण्यात आलेली होती. सदर विद्यार्थी क्षमता चाचणी सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व अधिकारी यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पाडण्यात आले.

 

अहेरी प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या क्षमता चाचणीमुळे कोणता विद्यार्थी नेमका कुठे मागे पडतोय, हे समजण्यास मदत होईल, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या मागे पडलेल्या अध्ययन क्षमतेवर काम करणे शिक्षकांना सोपे होईल. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासही मदत होईल. तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याकरिता प्रकल्प कार्यालय सर्वतोपरी प्रयत्नशील राहणार, 

वैभव वाघमारे

सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.