Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सुनील केदार मायग्रेनमुळे ऑक्सिजनवर, शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या दाखल करण्यात आलं.

नागपूरच्या जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात कोर्टाने शुक्रवारी काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना ५ वर्षांच्या कारावास आणि १२.५० लाख रुपये शिक्षा सुनावली आहे

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

नागपूर, 24 डिसेंबर : नागपूरच्या जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात कोर्टाने शुक्रवारी काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना ५ वर्षांच्या कारावास आणि १२.५० लाख रुपये शिक्षा सुनावली आहे.  शिक्षा सुनावल्यानंतर शुक्रवारी रात्री त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. त्यांच्या ईसीजीमध्ये (ECG) बदल दिसल्याने त्यांच्यावर रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. दरम्यान केदार यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढणार की त्यांना डिस्चार्ज मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

सुनील केदार यांना काल नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 150 कोटी रुपयांच्या रोख घोटाळ्याप्रकरणी पाच वर्षांचा कारावास आणि साडेबारा लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर काल रात्रीच त्यांना पोलिसांनी वैद्यकीय चाचणीसाठी मेडिकल रुग्णालयात नेले होते. तेव्हा त्यांनी प्रकृती संदर्भात काही तक्रारी डॉक्टरकडे केल्या होत्या. त्यांनी मायग्रेनमुळे तीव्र डोकेदुखीसह छातीत दुखत असल्याची तक्रार केली. तेव्हा काल रात्रीच डॉक्टरांनी केदार यांच्या ईसीजी, रक्ताच्या चाचण्यांसह इतरही काही चाचण्या केल्या होत्या. छातीतील इसीजीमध्ये थोडे बदल आढळून आले. हे बदल आधीचे आहे की आताचे, हे तपासले जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

प्रभासच्या ‘सालार’चा जगभरात डंका! कमाईचा आकडा शंभरी पार

 

Comments are closed.