Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रा. साईबाबा यांची सुटका रद्द सुप्रीम कोर्टाचे आदेश

मात्र सविस्तर सुनावणी करण्याचे निर्देश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नवी दिल्ली 15 ऑक्टोबर :- प्रा.जी एन साईबाबा यांच्या सुटकेच्या मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाच्या काल दिलेल्या आदेशाला स्थगिती देताना सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी सविस्तर सुनावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे प्रा.साईबाबा याची सुटका आता लांबणीवर पडली असून त्यांना सध्या तुरुंगातच रहावे लागणार आहे.

नक्षलींशी संबध प्रकरणात प्राध्यापक जीएन साईबाबा आणि इतरांची निर्दोष मुक्तता करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे. म्हणजेच प्राध्यापक जीएन साईबाबा आता तुरुंगातच राहणार आहेत. दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी. एन. साईबाबा आणि इतरांची सुटका करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या शुक्रवारच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी स्थगिती दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाचे न्यायमूर्ती एम. आर. शाह आणि न्यायमूर्ती बेला. एम. त्रिवेदी यांनी हा निर्णय दिला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठानेही या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन त्यावर सविस्तर सुनावणी करणार असल्याचे सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शुक्रवारी न्यायमूर्ती रोहित देव आणि न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या खंडपीठाने ट्रायल कोर्टाचा निर्णय रद्द करत त्यांची निर्दोष मुक्तता केली. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली २०१७ मध्ये अटक करण्यात आलेले प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांना ट्रायल कोर्टाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला प्राध्यापक साईबाबा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले.

२०१७ मध्ये त्याला महाराष्ट्रातील गडचिरोली न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, त्याविरोधात साईबाबाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ९० टक्के शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या साईबाबाला २०१४ मध्ये नक्षलवाद्यांचे समर्थन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. साईबाबा सुरुवातीपासूनच आदिवासी आणि जमातींसाठी आवाज उठवत आलेत. शारीरिक अपंगत्वामुळे व्हीलचेअरवर फिरणारे जी. एन. साईबाबा सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मार्च २०१७ मध्ये महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील सत्र न्यायालयाने साईबाबा, पत्रकार आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठा (JNU)च्या विद्यार्थ्याला कथित माओवादी संबंध आणि देशाविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल दोषी ठरवले. न्यायालयाने जी. एन. साईबाबा आणि इतरांना कठोर बेकायदेशीर हालचाली (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) आणि भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध तरतुदींखाली दोषी ठरवले होते.

हे पण वाचा :-

Comments are closed.