Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हृदयद्रावक घटना: गरोदर पत्नीच्या मृत्यूच्या धक्क्याने पतीनेही जीवन संपविले…

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पुणे/जुन्नर, 21नोव्हेंबर :- पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात अपघातामध्ये गरोदर पत्नीचा मृत्यू झाल्याच्या धक्क्यातून 29 वर्षीय पतीने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. रमेश कणसकर असे तरुणाचे नाव असून त्याने गुरुवारी विषारी द्रव्य प्राशन करून जीवन संपवले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील वारुळवाडी परिसरात 14 नोव्हेंबर रोजी रमेश कणसकर आपल्या सासू आणि पत्नी विद्यासोबत मोटारसायकलवरून जात असताना अपघात झाला. रमेशची मोटारसायकल एका स्पीड ब्रेकरला धडकली, त्यामुळे विद्या खाली उतरली पण तिला ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीने जोरदार धडक दिली. यात विद्याचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे पत्नी आणि न जन्मलेले मूल गमावल्याच्या धक्क्यामुळे व्यथित झालेल्या रमेशने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. पत्नीच्या मृत्यूनंतर तिच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या पतीने देखील आत्महत्या करून जीवन संपवल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सध्या या प्रकरणाचा जुन्नर पोलीस अधिक तपास करत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

उच्चशिक्षित वेकोलि प्रकल्पग्रस्त कामगारांना शैक्षणिक पात्रतेनुसारच नौकरी

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.