Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नागपुरात भाजपचा बालेकिल्ला ढासळला; काँग्रेसचे अभिजित वंजारी विजयी.

  • काँग्रेसचे अभिजित वंजारी यांना ६१,७०१ मते.
  • भाजपचे संदीप जोशींचा १८,९१० मतांनी पराभव.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नागपूर, दि.४ डिसेंबर: नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीमध्ये पाचव्या फेरीअखेर काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी १८ हजार ७१० मतांनी विजय झाले आहेत. त्यांना ६१ हजार ७०१ मते आणि भाजपचे संदीप जोशी यांना ४२ हजार ७९१ मते मिळाली आहे. काँग्रेसचे वंजारी यांनी ऐतिहासिक विजय मिळविला आहे.

यांनी १४,४०७ मतांची आघाडी घेतली होती. परंतु विजयी होण्यासाठी आवश्यक असणारा मतांचा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे मतदान प्रक्रियेतील भाग क्रमांक दोनची मतमोजणी करण्यात आली. त्यामध्ये वंजारी यांचा विजय सोपा झाला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पाचव्या फेरीअखेर एकूण १ लाख ३३ हजार ५३ मतांपैकी ११ हजार ५६० अवैध व १ लाख २१ हजार ४९३ मते वैध ठरलीत. त्यामध्ये अभिजित वंजारी ५५ हजार ९४७, संदीप जोशी ४१ हजार ५४०, राजेंद्रकुमार चौधरी २४६, राहुल वानखेडे ४ हजार १९१, अ‍ॅङ सुनिता पाटील २२६, अतुलकुमार खोब्रागडे १२ हजार ६६, अमित मेश्राम ५९, प्रशांत डेकाटे १ हजार ५३२, नितीन रोंघे ५३१, नितेश कराळे ७ हजार ४९१, डॉ. प्रकाश रामटेके २०६, बबन तायवाडे ८८, अ‍ॅड.मोहम्मद शाकीर अ.गफ्फार ६१,  राजेंद्र भुतडा १ हजार ५९२, प्रा.डॉ. विनोद राऊत १७४, अ‍ेँड. विरेंद्र कुमार जायस्वाल ६६, शरद जीवतोडे ३७, प्रा.संगीता बढे १२० आणि संजय नासरे ५६ मते पडली आहेत.

ही पण बातमी वाचा …

सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंग डिसले यांना ७ कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर.

Comments are closed.