Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गृहमंत्री अनिल देशमुख यांना बॅनर दाखवून बल्लारपूर शहरात केला निषेध

गृहमंत्री अनिल देशमुख पक्षाच्या मेळाव्यासाठी बल्लारपूरात आले असता चंद्रपूर जिल्हा युवा मोर्चाच्या वतीने बॅनर दाखवून केला निषेध

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर दि. २२ जानेवारी: चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात महाराष्ट्राचे गृहमंत्री मा. अनिलजी देशमुख यांचे कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्यात आगमन झाले यावेळी जिल्ह्यातील अनेक समस्यांवर वाढत्या महिला अत्याचाराच्या समस्या, अवैध दारू विक्रीची समस्या, वाढल्या गुन्हेगारीची समस्या किंवा पत्रकारांवर सातत्याने होणार्‍या हल्ल्यांच्या समस्या अशा अनेक समस्या या चंद्रपूर जिल्ह्यात असताना फक्त आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टिकोनातून आलेल्या मंत्र्यांना युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील वाढत्या अपराधावर जाब विचारणारे बॅनर दाखवून निषेध करून चंद्रपूर जिल्हा युवा मोर्चाच्या नेतृत्वात लक्ष वेधले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.