Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर: काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर 29 जानेवारी रोजी जाणार वाराणसीला

मतदार संघाचा घेणार आढावा. तीन दिवस वाराणसित मुक्काम.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपुर, दि. २३ जानेवारी: चंद्रपुर – आर्णी लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी नागपूर येथील राजभवन घेराव आंदोलनादरम्यान पक्षाने उमेदवारी दिल्यास पुढील लोकसभा निवडणूक वाराणसीतून नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध लढण्याची इच्छा प्रगट केली होती. या इच्छापूर्तीच्या दिशेने वाटचाल करण्याची तयारी म्हणून खासदार बाळू धानोरकर येत्या २ ९ जानेवारी रोजी वाराणसीला जाणार असून ते गंगा मातेचे दर्शन घेऊन ३१ जानेवारीपर्यंतच्या तीन दिवसीय दौऱ्यात वाराणसी लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या या धाडसी निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.