Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भीषण अपघात : भरधाव जाणाऱ्या पिक अप ने दिली ट्रक्टरला जोरदार धडक, धडकेत चालकासह वाहक जागीच ठार तर ८ जण जखमी

भामरागड आलापल्ली मार्गावरील घटना.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : आलापल्ली वरून भामरागड कडे जाणाऱ्या भरधाव जाणाऱ्या पिक अप वाहनाने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने चालकासह एक वाहक जागीच ठार तर ८ जण जखमी झाल्याची घटना काल २१ जून रोजी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास आलापल्ली भामरागड मार्गावर घडली आहे.

पिक अप वाहन चालक सुरत चांदेकर (२२), वाहक मारुती सिडाम (५५) अशी मृतकांची नावे आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्राप्त माहितीनुसार किराणा सामान व इतर साहित्यासह प्रवाशांना घेऊन पिकअप भरधाव वेगाने भामरागडकडे जात होते. दरम्यान पीकअप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यात सुरज चांदेकर, वाहक मारुती सिडाम यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर आठ जण जखमी झाले आहेत. जखमींवर अहेरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.