Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नागरिकांना दिलेला शब्द प्राधान्याने पूर्ण करू शकलो याचा मनापासून आनंद – जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार

आल्लापली येथे माळी समाजासाठी समाज भवनाचे - जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याहस्ते लोकार्पण.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

अहेरी : आलापल्ली येथील माळी समाजाची संख्या जास्त आहे. मात्र या समाजाच्या सांस्कृतीक तथा परंपरागत रूढी परंपरा, चालीरीती यांचे जोपसना करण्यासाठी व समाजाचे कार्यक्रम घेण्यासाठी समाजाचे समाजभवन नसल्याने अडचण होत होती.

सदर माळी समाजबांधवानी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे निवेदन देवून मागणी केली असता मागणीची दखल घेवुन जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिले असून ७ फेब्रुवारी २०२१ ला भूमिपूजन करण्यात आले होते. सदर समाज भवनाचे बांधकाम पूर्ण झाले असून आज जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार उदघाटन समारंभ कार्यक्रमात बोलतांना म्‍हणाले, आलापल्ली-वेलगुर क्षेत्रातून मी जेव्हा पहिल्यांदा जि. प. साठी उभे झालो असता नागरिकांनी अनेक समस्या सांगितले की, या क्षेत्रात मागील अनेक वर्षापासून समस्या आवासुन उभे आहेत. या क्षेत्रातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे विकास कामे झालेले नव्हते. मी जेव्हा निवडून आलो तेव्हापासून या क्षेत्रासाठी जास्तीत जास्त निधी मंजूर करून दिले असुन भरपूर कामे झाले असुन अनेक कामे सुद्धा करायचे आहेत.

या भागाच्या विकासासाठी कटिबद्ध असुन जास्तीत जास्त कामे करू असे शब्‍द दिला होता. सदर शब्‍द मी पूर्ण करत जास्तीत जास्त जिल्हा परिषदेचे विकास निधीतुन मंजूर करू शकलो तसेच आल्लापली येथे प्राधान्याने माळी समाजासाठी जिल्हा निधीतून १० लाख मंजूर करून दिले असुन समाज भवनाचे बांधकाम पुर्ण झाले असुन लोकार्पण आज माझ्या हस्ते पार पडल्याने याचा मला मनापासून आनंद होत आहे. असे ते यावेळी म्‍हणाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आलापल्ली ग्राम पंचायतचे माजी सरपंचा तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्या सुगंधा मडावी, ग्राम पंचायत सदस्या बेबीताई आत्राम, भाग्यश्री बेजनवार, कडते, वेलगुरचे उपसरपंच उमेश मौहूर्ले, माजी सरपंच दिलीप गंजीवार, माळी सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषतोम सोनूले, प्रशांत गोडसेलवार, जूलेख शेख, रहीम भैया व माळी समाजातील महिला-पुरुष यांची बहूसंख्येनी उपस्थितीत होती.

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन विशाल रापेलीवार यांनी केले.

हे देखील वाचा :

अहेरीत जावयाने केली सासऱ्याची गोळी झाडून हत्या

२६ जूनच्या चक्काजाम व जेलभरो आंदोलनात ओबीसींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – ओबीसी नेते रमेश भुरसे यांचे आवाहन

आत्मसमर्पितांसाठी असलेल्या नवजीवन वसाहत येथील कार्यक्रमाप्रसंगी एका जहाल महीला नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण

Comments are closed.