Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आत्मसमर्पितांसाठी असलेल्या नवजीवन वसाहत येथील कार्यक्रमाप्रसंगी एका जहाल महीला नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण

शासनाने ०६ लाख रुपयांचे बक्षीस केले होते जाहिर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. २३ जून : शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवांद्याचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे.

त्याच बरोबर आत्मसर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत. दिनांक २३/०६/२०२१ रोजी ०६ लाख रुपये बक्षीस असलेली एक जहाल महिला नक्षलवादी नामे शशीकला ऊर्फ गुनी ऊर्फ झुरी ऊर्फ अंजु आसाराम आचला हीने  पोलीस अधीक्षक गडचिरोली अंकित गोयल  यांच्या समोर आत्मसमर्पण केलेले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शशीकला ऊर्फ गुनी ऊर्फ झुरी ऊर्फ अंजु आसाराम आचला वय- ३० वर्ष रा. मोठा झलीया पोमके गॅरापत्ती त. धानोरा जिल्हा गडचिरोली ही डिसेंबर २००६ रोजी टिपागड दलम मध्ये सदस्य पदावर भरती होवुन सध्या टिपागड एलओएस मध्ये ए.सी.एम, पदावर कार्यरत होती. हिचेवर चकमकीचे १५, जाळपोळ ०१ व इतर ०४ असे एकुण २० गुन्हे दाखल असुन शासनाने ०६ लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे सन २०१९ ते २०२१ सालामध्ये एकुण ३९ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यामध्ये ४ डिव्हीसी, ०२ दलम कमांडर, ०३ उपकमांडर, २९ सदस्य व ०१ जनमिलीशिया यांचा समावेश आहे. गडचिरोली पोलीस दलाने सातत्यपुर्ण यशस्वी नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच गडचिरोली पोलीसांनी जिल्हाभरात आदिवासी बांधवांकरीता घेतलेले जनजागरण मेळावे, रोजगार मेळावे, महिला मेळावे, ग्रामभेटी तसेच जे तरुण-तरुणी नक्षलमध्ये भरती झाले आहेत, त्यांच्या घरी पोलीसांनी जावुन त्यांना सुखी जीवनाचे महत्व पटवून सांगितल्याने व नक्षल नातेवाईकांसाठी मदत व आयोजित केलेल्या सहलीमुळे तसेच कार्यरत नक्षल सदस्यांचे कुटुंबियाच्या मेळावे यामुळेत्यांच्या मनात पोलीस दलाविषयी निर्माण झालेला विश्वास याचा परीपाक म्हणुन आज या जहाल महिला नक्षलवाद्यांने आत्मसमर्पण केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

याचाच एक भाग म्हणुन दिनांक २३/०६/२०२१ रोजी आत्मसमपीत झालेल्यांसाठी असलेल्या नवजीवन वसाहत येथे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचे हस्ते नवजीवन वसाहत बोर्डचे अनावरण, वृक्षारोपण व आत्मसमर्पण कल्याण कार्डचे अनावरण झाले व नक्षलवादाचा खडतर मार्ग सोडुन विकासाच्या मुख्य प्रवाहात आलेली शशिकला ऊर्फ गुनी हीचा पोलीस अधीक्षक यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले की आत्मसमर्पितांसाठी नवजीवन वसाहत येथे विदयुतीकरण, पाण्याची सुविधा तसेच त्यांना नोकरी मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच शिवणकाम, मोटार ड्रायव्हिंग, गवंडी, काम याचे प्रशिक्षण देवुन त्यांना आत्मनिर्भर बनवणार आहोत.

विकास कामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या नक्षलवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुनजे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील, त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल. असे आवाहन  पोलीस अधीक्षक गडचिरोली अंकित गोयल  यांनी केले आहे.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान)  मनिष कलवानिया , अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी  सोमय मुंडे हे उपस्थित होते.

हे देखील वाचा  :

मोठी बातमी : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या घराबाहेर स्फोट

पिक कर्ज द्या अन्यथा नक्षलवादी होण्याची परवानगी द्या! – स्वाभिमानी शेतकरी संघटनेची अजबच मागणी

प्राचार्य संजीवकुमार भारद्वाज यांना ‘ग्लोबल प्रिंन्सीपल अवार्ड’ ने सन्मानीत  

 

 

 

Comments are closed.