Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्हयात हत्तीरोग दुरीकरण मोहीम 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. 23 जून : सन 2005 पासुन एक दिवशीय सामुदायिक औषधोपचार मोहीम गडचिरोली जिल्हयात राबविण्यात येत असून यावर्षी सुध्दा राबविण्यात येणार आहे. सन 2021 च्या मोहीमेत आयव्हरमेक्टीन, डी.ई.सी. व अल्बेंडाझोल या तीन प्रकारच्या गोळया वयोगटानुसार व उंचीनुसार 2 वर्षखालील बालके, गरोदर माता व गंभीर आजार असलेले रुग्ण सोडून लाभार्थ्यांना खाऊ घालण्यात येणार आहेत.

सदर मोहीम 1 जुलै ते 15 जुलै 2021 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.  हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता जिल्हाधिकारी यांच्या दालनात वेगवेगळया विभागामार्फत जिल्हा स्तरावर समन्वय समिती घेण्यात आली. सदर कार्यक्रम हा जिल्हयातील प्रत्येक गाव पातळीपर्यंत राबवून यशस्वी करण्याकरीता आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेवक, अंगणवाडी सेविका व इतर स्वयंसेवक यांच्यामार्फत गोळया खाऊ घालण्यात येईल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्याच बरोबर तालुका स्तरावर वैद्यकीय अधिकारी यांची टिम नेमण्यात आली आहे गोळया सेवन केल्यानंतर गुतागुंत निर्माण झाल्यास तात्काळ औषधोपचार या टिम द्वारे करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी बैटकीत मार्गदर्शन केले.
गडचिरोली जिल्हयात आर्जपर्यंत 3862 हत्तीरोग रुग्ण आढळून आले असून नियमित औषधोपचार करण्यात येत आहे.

तसेच जिल्हयात एकुण 1930 अंडवृध्दी रुग्ण असून त्यापैकी 389 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आले आहे. हत्तीरोग किटकाची ओळख , क्युलेक्स डासाच्या मादीच्या पोटात , छातीत , सोंडेत लारवीची वाढ कशी होते, निरोगी व्यक्तीच्या शरीरात परजिवी जंतु नर-मादी गेल्यावर 18 महिन्यांनी हत्तीरोग कसा होतो, परजिवी कृमीचा घात करण्यातकरीता Ivermectin, Diethylcarbamazine, Albendazole, औषध शासनामार्फत उपलब्ध करण्यात आले आहे. या औषधाच्या सेवनामुळे हत्तीरोगाच्या कृमीचा नायनाट पुर्ण होतो.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हा कार्यक्रम गोळया वाटपाचा कार्यक्रम नसून लाभार्थ्यांला औषधोपचार खाऊ घालण्याचा आहे. याची दक्षता गोळया खाऊ घालणाऱ्यानी घ्यावी. या औषधाने कसलाही दुष्परिणाम होत नाही. हत्तीरोग हा आजार मॉयक्रो वुचेरेरीया बेनक्रोप्टी या फॉयलेरिया कृमीमुळे होतो. मॉयक्रो फॉयलेरियाची कृमी दुषित क्युलेक्स मादी डासापासून माणसाच्य शरीरात प्रवेश करते. क्युलेक्स डासाची उत्पत्ती घाण पाण्यात होते. पायावर सुज येणे, हत्तीच्या पायासारखे पाय होणे, अंडवृध्दी होणे हे हत्तीरोगाची लक्षणे आहेत, असे डॉ.कुणाल मोडक जिल्हा हिवताप अधिकारी गडचिरोली यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला दिपक सिंगला जिल्हाधिकारी गडचिरोली, डॉ.सुनिल मडावी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.विनोद म्हशाखेत्री अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा साथरोग अधिकारी, डॉ.अमरदीप नंदेश्वर वैद्यकीय अधिकारी जिल्हा प्रशिक्षण केंद्र गडचिरोली, डॉ. पंकज हेमके जिल्हा नोडल अधिकारी, डॉ.धुर्वे, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, कतलाम पोलीस उपअधिक्षक गडचिरोली, लव्हाळे हत्तीरोग अधिकारी राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण पथक धानोरा, अमरदीप गेडाम विस्तार अधिकारी शिक्षणाधिकारी कार्यालय (माध्यमिक), राजेश कार्लेकर जिल्हा व्ही.बी.डी. सल्लागार जिल्हा हिवताप कार्यालय गडचिरोली, व्ही.पी.नाकाडे उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषदा गडचिरोली, व्ही.पी.कोसनकर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी जिल्हा हिवताप कार्यालय, गडचिरोली इत्यादी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

हे देखील वाचा :

आत्मसमर्पितांसाठी असलेल्या नवजीवन वसाहत येथील कार्यक्रमाप्रसंगी एका जहाल महीला नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण

गडचिरोली येथे 27 जुन ला स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन शिबीर

प्राचार्य संजीवकुमार भारद्वाज यांना ‘ग्लोबल प्रिंन्सीपल अवार्ड’ ने सन्मानीत  

 

Comments are closed.