गाळा माझा निघाला तर कुलूप लावा – किशोरी पेडणेकर
संतापलेलया पेडणेकर कुलूप घेवून उतरल्या रस्त्यावर, दादर पोलिसांकडून पेडणेकर यांची चौकशी सुरू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, 29, ऑक्टोबर :- ‘दरवेळी आम्हाला आरोपींच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे. एसआरएने कळवलं आहे की किशोरी पेडणेकर यांचा यामध्ये संबंध नाही. मात्र तरीही वारंवार दबावतत्रांचा वापर सुरू आहे. आमच्यावर वार करून जेरीस आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. एक जरी गाळेधारक बोलला की हा गाळा किशोरी पेडणेकर यांचा आहे तर त्या गाळ्याला कुलूप लावा. एका सामान्य महिलेला तुमचा एक माणूस त्रास देतोय, येथे भाड्याने राहणे गुन्हा होता का?’ असा संतप्त सवाल पेडणेकर यांनी विचारला आहे.
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना लक्ष्य करत गंभीर आरोप केले आहेत. मुंबईतील गोमाता नगरमध्ये किशोरी पेडणेकर यांनी अनधिकृतरित्या गाळा खरेदी केल्याचा दावा करण्यात आला. सोमय्या यांच्या आरोपानंतर किशोरी पेडणेकरांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या सर्व घडामोडींनंतर संतापलेल्या पेडणेकर या आज सकाळी हातात टाळा घेऊनच रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं.
किशोरी पेडणेकर या माध्यमांसह गोमाता नगरमध्ये दाखल झाल्या. यावेळी त्यांनी हातात टाळाही आणला होता. जो व्यक्ती सांगेल हा गाळा माझ्या मालकीचा आहे, त्या गाळ्याला मी स्वत: टाळा लावते, असं त्या सांगत होत्या. मात्र तिथं उपस्थित असणाऱ्या एकाही गाळामालकाने पेडणेकर यांचं नाव घेतलं नाही. त्यानंतर पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपवर गंभीर आरोप केले. दरम्यान दादर पोलिसांनी पेडणेकर यांना चौकशीसाठी बोलवले होते, त्यांची कसून चौकशी करण्यात येत असून त्यांना पुन्हा उद्याही चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलविले आहे.
हे देखील वाचा :-
Comments are closed.