Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरोनानंतर आता एका नव्या विषाणू चे टेन्शन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वाॅशिंग्टन,  29, ऑक्टोबर :- कोरोनानंतर आता जगात आणि एका नव्या विषाणूचे टेन्शन आहे. अमेरिका, ब्रिटन आणि मोझांबिक मध्ये पोलिओचा विषाणू आढळला आहे. लंडनमध्ये एका भागातल्या सांडपाण्यात तर काही महिन्यांपूर्वी न्यूयाॅर्कमध्ये ही पोलिओचा विषाणू आढळला होता. मोझांबिकमध्ये मे महिन्यात तर फेब्रुवारीत मलाविमध्ये विषाणू आढळला होता.

जगभरात कोरोना संकटामुळे काही काळ लसीकरण मोहीम ठप्प पडली होती. परिणामी पोलिओ विषाणूंचा प्रसार झाल्याचे म्हटले जात आहे. पण जगातल्या कोणत्याही भागात पोलिओचे विषाणू सापडणे हे सर्वांसाठी धोकादायक ठरू शकते असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, जुलै महिन्यात न्यूयाॅर्क येथील राॅकलॅंड कौंटीत राहणार्या व्यक्तीत पोलिओचा विषाणू आढळून आला. त्याने लस घेतलेली नव्हती अशी माहिती पुढे आली आहे. याशिवाय त्याच्या घराजवळ सांडपाण्यातही विषाणू आढळला. तसेच उत्तर आणि पूर्व लंडनमध्ये फेब्रुवारी आणि मे महिन्यात सांडपाण्यात पोलिओचा विषाणू सापडला. मे महिन्यात मोझांबिक येथे एका बाळात पोलिओचा विषाणू आढळून आला. तर फेब्रुवारीत मलावी येथे पोलिओच्या वेगळ्या प्रकाराचा विषाणू आढळला होता. त्यामुळे आता चिंता व्यक्त होत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोलिओ किंवा पोलिओमायलिटिस हा एक प्राणघातक रोग आहे. हा पोलिओ व्हायरसमुळे होतो. हा विषाणू एका व्यक्ती मध्ये पसरते आणि एखाद्या व्यक्तीच्या पाठीच्या कण्याला इजा पोहोचवू शकतो. ज्यामुळे अर्धांगवायू होतो. पोलिओवर कोणताही इलाज नाही. परंतु सुरक्षित आणि प्रभावी लसीकरणाने तो टाळता येउ शकतो. इनएक्टिव्हेटेड पोलिओ लस ही एकमेव पोलिओ लस आहे जी 2000 पासून युनायटेड स्टेट्समध्ये दिली जात आहे. भारतात 0 ते 5 वयोगटापर्यंतच्या मुलांना ही लस मोफत देण्यात येत आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.