Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर जिल्ह्यात आज 128 जण कोरानाबाधित तर 64 कोरोनामुक्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • आतापर्यंत 23,910 जणांची कोरोनावर मात
  • ॲक्टीव पॉझिटिव्ह 1075

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. 19 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 64 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 128 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 25 हजार 392 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार 910 झाली आहे. सध्या 1075 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 43 हजार 567 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 14 हजार 493 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 407 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 368, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आज बाधीत आलेल्या 128 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 30, चंद्रपूर तालुका 15, बल्लारपूर चार, भद्रावती 22, ब्रम्हपुरी तीन, नागभिड पाच, सिंदेवाही 10, मूल सहा, सावली दोन, गोंडपिपरी दोन, राजुरा दोन, चिमूर सात, वरोरा 17, कोरपना दोन व इतर ठिकाणच्या एका रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.