Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर जिल्ह्यात आज 28 कोरोनामुक्त तर 22 पॉझिटिव्ह

  • आतापर्यंत 22,193 जणांची कोरोनावर मात
  • ॲक्टीव पॉझिटिव्ह 276

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. 17 जानेवारी: जिल्ह्यात मागील 24 तासात 28 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 22 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 850 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 193 झाली आहे. सध्या 276 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 89 हजार 391 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 64 हजार 848 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 381 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 346, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 12, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 22 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील आठ, भद्रावती सात, नागभिड एक, वरोरा एक, कोरपना एक व इतर ठिकाणच्या चार रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.