Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! मित्रानेच केला मित्राचा खून

Get real time updates directly on you device, subscribe now.

जालना शहरात सदरबाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला प्रकार

विजय साळी, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जालना, दि. १७ जानेवारी: जालना शहरातील नवीन जालना भागातील कालिकुर्ती परिसरात खून झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली, याप्रकरणी सदर बाजार पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी खून झालेल्या ठिकाणची पाहणी करीत एकाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नविन जालना परिसरातील कालिकुर्ति भागात राहणारे जगदिश तुलशीराम भुरेवाल यांच्या घरी त्याचा मित्र शे युनूस शे हासन वय ५० वर्ष रा. कुंभेफळ हा आज सकाळी मयत अवस्थेत आढलून आला. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता त्यांना शे.युनूस हा मृतावस्थेत दिसून आला. शे युनूस यास जगदिश भुरेवाल याने लोख़ंडी वस्तूने त्याच्या डोक्यात मारले आसून तो मयत झाला आहे.

अशी तक्रार त्याच्या भाऊ गोरे दानी हसन शेख यांनी दिली असून भा.दं.वी. ३०२ अन्वये गुन्हा नोंद केला असून आरोपी जगदीश भुरेवाल यास अटक केली आसल्याची माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी दिली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.